Pollutionमुळे 9 वर्षांनी कमी होऊ शकते तुमचे आर्युमान

अमेरिकेतील एका संशोधन संस्थेने म्हटले की वायु प्रदूषणामुळे 40 टक्के लोकांचे वय 9 वर्षांनी कमी होऊ शकते.
Pollutionमुळे 9 वर्षांनी कमी होऊ शकते तुमचे आर्युमान
तुमच्या आयुष्याचे 9 वर्ष फक्त प्रदूषणामुळे होऊ शकते कमी Dainik Gomantak

भारतात दिवसेंदिवस प्रदूषण (Pollution) वाढत चालले आहे. यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अमेरिकेतील एका संशोधन संस्थेने म्हटले की वायु प्रदूषणामुळे 40 टक्के लोकांचे वय 9 वर्षांनी कमी होऊ शकते. वायु प्रदूषण (Air Pollution) लवकरात लवकर कमी करण्यासाठी पाऊले उचलणे गरजेचे आहे. याबाबत शिकागो विद्यापीठाच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटच्या (EPIC) अहवालानुसार मध्य, पूर्व आणि उत्तर भारतात राहणाऱ्या 48 दशलकक्षाहून अधिक लोक प्रदूषणरहित भागात राहत आहेत. देशाची राजधानी दिल्लीचाही (Delhi) यामध्ये समावेश आहे. अहवालात असे म्हटले आहे की, "हे प्रदुषण चिंताजनक असून अनेक भागात वायु प्रदूषण (Air Pollution) मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे.

तुमच्या आयुष्याचे 9 वर्ष फक्त प्रदूषणामुळे होऊ शकते कमी
तालिबानचा मोठा दावा; पंजशीरमधील शुतार जिल्ह्यावर केला काब्जा

यामध्ये, 2019 मध्ये सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रमाचे (NCAP) यामध्ये कौतुक करण्यात आले असून, जर याप्रमाणेच आपण आपले लक्ष्य ठरवून त्या लक्ष्यापर्यंत पोहोचत गेलो तर देशातील लोकांचे आयुर्मानात 1.7 वर्षांनी वाढ होईल. तर नवी दिल्लीतील आयुर्मान 3.1 वर्षांनी वाढेल. 2024 पर्यंत वायू प्रदूषणामुळे सर्वाधिक प्रभावित देशातील 102 शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी 20-30 टक्के कमी करण्याचे एनसीएपीचे उद्दिष्ट आहे.

Air pollution
Air pollutionDainik Gomantak

औद्योगिक उत्सर्जन आणि वाहनांचे धूर, वाहतूक इंधन आणि जैव इंधन जाळण्यासाठी कठोर नियम लागू करणे, धुळीमुळे होणारे प्रदूषण कमी करणे. याच्या देखरेखीसाठी चांगल्या यंत्रणांची गरज पडणार आहे. भारताच्या शेजारील देशांमधील परिस्थितीचे मुल्यमापन करतांना, EPIC ने म्हटले आहे की, बांग्लादेशने जर जागतिक आरोग्य संघटनेने निर्धारीत केलेले उद्दिष्ट आणि हवेच्या गुणवत्तेची पातळी पूर्ण केल्यास आयुर्मान 5.4 वर्षांनी वाढू शकते. वयाची आकडेवारी काढण्यासाठी EPIC ने दीर्घ कालावधीत वायु प्रदूषणाच्या विविध स्तरांना सामोरे जाणाऱ्या लोकांच्या आरोग्याची तुलना केली आणि नंतर त्या निकालाच्या आधारे भारत आणि इतर देशांमधील परिस्थितीचा अभ्यास केला. स्वित्झर्लंडमधील आईक्यूएयर नावाच्या संस्थेच्या मते, नवी दिल्लीने सलग तिसऱ्यांदा जगातील सर्वात प्रदूषित राष्ट्रीय राजधानीचा दर्जा प्राप्त केला आहे. आईक्यूएयर हवेतील पीएम 2.5 नावाच्या कणांच्या आधारावर हवेची गुणवत्ता मोजतो. या कणांमुळे फुफ्फुसचे आरोग्य धोक्यात येते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com