भारत पाकिस्तानमध्ये युद्धाची शक्यता? अमेरिकी गुप्तचर खत्याचा दावा  

दैनिक गोमंतक
बुधवार, 14 एप्रिल 2021

स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध खूपच बिघडले आहेत. आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये चार वेळ लढाई झाली असून चारही वेळा पाकिस्तानच्या चिथावणीमुळेच या लढाया झाल्या आहेत आणि यात पाकिस्तानलाच पराभवाचा सामना करावा लागला आहे. तथापि, भारत आणि पाकिस्तानात पुन्हा एकदा युद्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध खूपच बिघडले आहेत. आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये चार वेळ लढाई झाली असून चारही वेळा पाकिस्तानच्या चिथावणीमुळेच या लढाया झाल्या आहेत आणि यात पाकिस्तानलाच पराभवाचा सामना करावा लागला आहे. तथापि, भारत आणि पाकिस्तानात पुन्हा एकदा युद्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमेरिकेच्या  इंटेलिजन्स कम्युनिटी रिपोर्ट २०२१ या  गुप्तचर अहवालात हा दावा करण्यात आला आहे. पाकिस्तानने पुन्हा भारताला चिथावणी दिली तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत पाकिस्तानविरूद्ध लष्करी कारवाई करू शकतो, असे या अहवालात म्हटले आहे.  नरेंद्र मोदी यांचे सरकार पूर्वीच्या सरकारांइतके शांत राहणार नाही.  पंतप्रधान मोदीं यांचे सरकारच्या पाकिस्तानवर लष्करी कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. (Possibility of war between India and Pakistan? US intelligence claims) 

एलएसी'वर चीनकडून HQ9 आणि HQ22 क्षेपणास्त्र तैनात; भारतानेही मजबूत केले...

त्याचबरोबर, भारताने आपले धोरण बदलले आहे, आता भारताची सहन करण्याची ताकद संपली आहे, त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सरकार पाकिस्तानवर सैन्य कारवाई करण्यास मागे हटणार नाही. असे अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात  सांगण्यात आले आहे. तसेच, भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाची शक्यता कमी असली तरी भविष्यात हे  संकट आणखी वाढू शकते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होण्याची शक्यता नसली तरी या दोघांमधील संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे, असे डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स (ओडीएनआय) च्या कार्यालयाने अमेरिकन कॉंग्रेसला आपल्या वार्षिक धमकी मूल्यांकन अहवालात स्पष्ट केले आहे. अफगाणिस्तान, इराक आणि सीरियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम अमेरिकेच्या सैन्यांवर होत आहे आणि अशातच अण्वस्त्रधारी भारत आणि पाकिस्तानमधील तणाव हे जगासाठी चिंता वाढवण्याचे कारण बनत आहेत.

अमेरिकेच्या नौदलाची भारताला धमकी; काय आहे FONOP? जाणून घ्या

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने यापूर्वी दोनदा पाकिस्तानवर लष्करी कारवाई केली आहे.  फेब्रुवारी 2019 मध्ये एका पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मिरच्या पुलवामा येथे भारतीय सैन्यावर हल्ला केला होता, ज्यात बरेच भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोट येथे हवाई हल्ला केला, ज्यामध्ये सुमारे 300 दहशतवादी ठार झाले. 2016मध्ये भारतातील उरी येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या भूमीत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. अशा परिस्थितीत अमेरिकन गुप्तचर अहवालात म्हटले आहे की आता  पाकिस्तानने पुन्हा भारताला चिथावणी दिली तर मोदींच्या नेतृत्वात सरकार पाकिस्तानवर सैन्य कारवाई करू शकते.

संबंधित बातम्या