हॉंगकॉंगकडून फायझर लसीच्या वापरावर स्थगिती

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 25 मार्च 2021

फायझर लशीच्या बाटल्यांची झाकणे व्यवस्थित नसल्यामुळे या लशीच्या वापरावर रोख लावण्यात आला आहे.

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. फ्रान्स पाठोपाठ जर्मनीने सुध्दा पुन्हा देशात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर हॉंगकॉंगने एक मोठा निर्णय घेतला आहे. फायझर लशीच्या बाटल्यांची झाकणे व्यवस्थित नसल्यामुळे या लसीच्या वापरावर रोख लावण्यात आला  आहे. या लसीच्या एका चीनी वितरकाने एका खोक्यामधील लसींच्या बाटल्यांची झाकणे व्यवस्थित नसल्याची तक्रार केली होती.

फोसुन फार्मा या वितरकांनी तसेच बायोएनटेक कंपनीने त्यासंबंधीची चौकशी सुरु केली आहे. बायोएनटेकने फायझर कंपनीची लस तयार केली आहे. बायोएनटेक आणि फोसुन फार्मा यांना हे उत्पादन असुरक्षित असल्याची कोणतीही कारणे दिसून आली नाहीत. परंतु प्रतिबंधक उपायासाठी या लसीला थांबवण्यात आले आहे. परंतु बायोएनटेक आणि फोसुन फार्मा यांच्यांशी तातडीने संपर्क होऊ शकलेला नाही. हॉंगकॉंगमधील सर्व सामुदायिक आरोग्य केंद्रावर फायझर लस देण्यात येत होती. मात्र आता फायझर लसीचा वापरावर रोख लावला आहे. फायझरच्या लसीला रोख लावल्यामुळे आता हॉंगकॉंगमधील नागरिकांना चीनच्या सिनोव्हॅकने बनवलेली लस घ्यावी लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. हॉंगकॉंगकडे फायझर आणि सिनोव्हॅक या दोन लसींचा पर्याय आहे. बुधवारी सकाळी लस घेण्यासाठी वेळ घेतलेले नागरिक रांगेत उभे होते. मात्र त्यांना कोणतीही लस देण्यात आली नाही. (Postponement on the use of Pfizer vaccine from Hong Kong)

जर्मनीत पुन्हा लॉकडाऊन; पाच दिवसातून एकदाच उघडली जाणार दुकाने

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना प्रसारमाध्यमांची नजर चुकवून लस देण्यात आल्याचे त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले. मात्र दुसरीकडे या देशात कोरोना लसीकरणाचा वेग आधिच कमी असल्याने पुन्हा लसीकरणाचा वेग वाढेल की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुतीन यांनी कोरोनाची लस घेतल्यानंतर त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे, त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.   
 

संबंधित बातम्या