बायडन यांच्या शपथविधीआधी सशस्त्र आंदोलनाची तयारी;FBI चा इशारा 

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 12 जानेवारी 2021

जो बायडन यांच्या शपथविधीआधी सशस्त्र आंदोलनाची होण्याची शक्यता असल्याचा FBI ने  इशारा दिला आहे.त्यामुळे वॉशिंग्टन डीसी आणि इतर राज्यांमध्ये हिंसक आंदोलन होण्याची शक्यता आहे.

वाशिंग्टन:अमेरिकेत बुधवारी अमेरिकन लोकशाहीला काळीमा फासणारी घटना घडली.अमेरिकन संसद अर्थात कैपिटॉल हिल इमारतीत झालेल्या हिंसाचारामुळे आधीच तणावाचे वातावरण असताना जो बायडन यांच्या शपथविधीआधी सशस्त्र आंदोलनाची होण्याची शक्यता असल्याचा FBI ने  इशारा दिला आहे.त्यामुळे वॉशिंग्टन डीसी आणि इतर राज्यांमध्ये हिंसक आंदोलन होण्याची शक्यता आहे.

यामुळे राजधानीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.सुरक्षेसाठी जवळपास 15 हजार तुकड्या तैनात केल्या जाणार आहेत. वॉशिंग्टन स्मारकाला भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांवर 24 जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.जो बायडन यांच्या शपथविधीला 'अमेरिका युनाटेड' ही संकल्पना असणार असल्याचे त्यांच्या टीम कडून सांगण्यात येत आहे.FBI 16जानेवारी ते 20 जानेवारी या कालावधीत ही हिंसक आंदोलन होण्याची शक्यता वर्तवली आहे.

तसेच शपथविधीनंतर ही तीन दिवंसांसाठीचा इशारा दिला आहे.डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कैपिटॉल हिल इमारतीत झालेल्या हिंसाचारास उत्तेजन दिल्या कारणाने महाभियोग चालवण्यासाठी कायदा संमत करण्याच्या दिशेने पावले उचलली जात असल्याची माहिती प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्षा नन्सी पलोसी यांनी दिली.ट्रम्प यांना पदावरुन हटवण्यासाठी उपाध्यक्ष माइक पाइन्स यांनाही आवाहन केलं होतं.तसेच मंत्रीमंडळाने घटनात्मक कायद्यांचा वापर करुन त्यांना पदावरुन हटवण्यात यावं असं मत पलोसी यांनी व्यक्त केलं आहे.

संबंधित बातम्या