राष्ट्राध्यक्ष बायडन फायझर लसी करणार दान; G-7 बैठकीत होऊ शकते घोषणा

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 10 जून 2021

आता बायडन यांच्या निर्णयामुळे जगतील अन्य देशांना याचा फायदा होणार आहे.

जगभरात कोरोना संसर्ग (Covid19) वाढत असताना अमेरिकेचे (America) नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. फायझर बायोएनटेक (Pfizer Bioentech) लसीचे 50 कोटी डोस दान करण्यासाठी खरेदी करत आहेत. अमेरिकन माध्यमांनी यासंबंधीचा खुलासा केला आहे. तसेच राष्ट्राध्यक्ष बायडन G-7 बैठकी दरम्यान घोषणा करतील असे सांगण्यात आले आहे. जगभरातील अनेक देशात कोरोना लसींची (Corona vaccine) कमतरता जणवत आहे. आता बायडन यांच्या निर्णयामुळे जगतील अन्य देशांना याचा फायदा होणार आहे. अमेरिकेमध्ये एकूण लोकसंख्येच्या निम्म्याहून अधिक लोकांना कोरोना लसीचे दोन्हीही डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर तेथील कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात रोखण्यात यश आले आहे.

'क्वाड' देशांकडून अग्नेय आशियातील देशांना एक अब्ज लसींचा पुरवठा

ब्रिटनसह सात देशांसोबत G-7 च्या बैठकीपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी कोरोना लसी दान करण्याचे संकेत दिले होते. ज्यावेळी स्थानिक माध्यमांनी बायडेन यांना जगातील अन्य देशांना कोरोना लसी देण्याच्या धोरणासंबंधी विचारले असता त्यांनी लवकरच यासंबंधीची घोषणा करणार असल्याचे सांगितले. बायडेन यांनी कोरोना लसी दान देण्याची घोषणा करण्यासाठी फायझर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोएर्ला (Albert Boerla) यांच्यासोबत हजर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे ही घोषणा अमेरिकेच्या हितासाठी नसून जगत कल्याणासाठी असेल, असेही यावेळी त्यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या