Queen Elizabeth II यांच्या अंत्यसंस्कारासाठी राष्ट्रपती दौपदी मुर्मू राहणार उपस्थित

Queen Elizabeth II's funeral: हा दिवस ब्रिटनमध्ये सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित करण्यात आला आहे.
Queen Elizabeth II| President Droupadi Murmu
Queen Elizabeth II| President Droupadi Murmu Dainik Gomantak

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शासकीय अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी ब्रिटनला जाणार आहेत. भारत सरकारच्या वतीनेसंवेदना व्यक्त करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 17-19 सप्टेंबर 2022 रोजी लंडनला भेट देतील. राणीचे अंत्यसंस्कार 19 सप्टेंबर रोजी वेस्टमिन्स्टर अॅबे येथे होणार आहेत. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शासकीय अंत्यसंस्कारासाठी शेकडो राष्ट्रप्रमुख हजेरी लावणार आहे.

हा दिवस ब्रिटनमध्ये सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित करण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडनसुध्दा राणीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत.तसेच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो देखिल लंडनला भेट देणार आहेत. ब्रिटनच्या दिवंगत राणी एलिझाबेथ यांचे पार्थिव मंगळवारी संध्याकाळी स्कॉटलंडहून लंडनला पोहोचले आहे.

Queen Elizabeth II| President Droupadi Murmu
Ed Raid: दारू घोटाळ्याप्रकरणी ED ची मोठी कारवाई, 6 राज्यांमध्ये 40 ठिकाणी छापे

एलिझाबेथ यांची शवपेटी काल रात्री बकिंगहॅम पॅलेसमध्ये ठेवण्यात आली. बुधवारपासून चार दिवस राणीची शवपेटी वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये ठेवण्यात येणार असून सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. एडिनबर्ग विमानतळावरून राणीची शवपेटी लंडनसाठी पाठवण्यात आली तेव्हा तिथे राष्ट्रगीत वाजवण्यात आले. राणीची शवपेटी तिची मुलगी प्रिन्सेस अॅनसह रॉयल एअर फोर्स विमानाने लंडनला आणण्यात आले. ज्या विमानातून राणीची शवपेटी आणली गेली होती ते विमान मानवतावादी मदतीसाठी यापूर्वी वापरले गेले आहे.

पश्चिम लंडनमधील आरएएफच्या नॉर्थहॉल्ट हवाई तळावर विमान उतरताच राणीची शवपेटी रस्त्याने मध्य लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमध्ये नेण्यात आली. मंगळवारी किंग चार्ल्स तिसरे हे शवपेटी स्वीकारण्यासाठी पत्नी कॅमिलासह शाही निवासस्थानी आधीच पोहोचले होते. शवपेटी लंडनला पोहोचण्यापूर्वी आणि बकिंगहॅम पॅलेसमध्ये पाठवण्यापूर्वी आरएएफकडून सलामी देण्यात आली होती.त्यांचे वयाच्या 96 व्या वर्षी बालमोरल कॅसल येथे गुरुवारी निधन झाले. ब्रिटनवर सर्वाधिक काळ राज्य करणाऱ्या राणी ठरल्या आहेत. त्यांनी 70 वर्षे राज्य केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com