जो बायडन प्रशासनाने बदलला अमेरिकेचा नागरिकत्व कायदा; 1 मार्चपासून होणार लागू

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनाने अमेरिकेचे नागरिकत्व मिळविण्यासाठी पात्र असणाऱ्यांसाठी पुर्ववर्ती डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचे धोरण मागे टाकत 2008 चे धोरण स्वीकारण्याची घोषणा केली. 

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनाने अमेरिकेचे नागरिकत्व मिळविण्यासाठी पात्र असणाऱ्यांसाठी पुर्ववर्ती डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचे धोरण मागे टाकत 2008 चे धोरण स्वीकारण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे सर्व पात्र लोकांसाठी नागरिकत्व मिळण्याचा मार्ग सोयीचा झाला आहे. यूएस सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस (यूएससीआयसी) यांनी सोमवारी सांगितले की, नवीन धोरण 1 मार्चपासून अंमलात येणार आहे. यूएससीआयसीने गेल्या वर्षी 1 डिसेंबर रोजी नागरिकत्व परीक्षांमध्ये बदल केला होता, ज्याला 2020 ची नागरिकत्व परीक्षा म्हणतात.

पाकिस्तानच्या 65 वर्षांच्या मौलानाने केला 14 वर्षीय मुलीशी निकाह

यापूर्वीच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन नागरिकत्वासाठी पात्र असणाऱ्यांसाठी नागरिकत्व परीक्षा बदलण्याचा स्वाभाविकपणे निर्णय घेतला होता. त्याअंतर्गत प्रश्नांची संख्या 100 वरून 128 करण्यात आली होती आणि एकाधिक निवड प्रश्नांमध्ये राजकीय आणि वैचारिक ट्रेंडचे परीक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला.धोरण बदलण्याची घोषणा करताना यूएससीआयएसने असे सांगितले की, एजन्सीने अशी शक्यता वर्तविली आहे की सुधारित नागरिकत्व परीक्षा 1 डिसेंबर 2020 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करणाऱ्यांसाठी संभाव्य अडथळा ठरू शकते.

नेपाळचे कार्यवाहक पंतप्रधान के पी शर्मा ओली यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

 

संबंधित बातम्या