चीनची कोरोना लस घेऊनसुद्धा पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष कोरोना बाधित

दैनिक गोमंतक
सोमवार, 29 मार्च 2021

पंतप्रधान इम्रान खान कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर 10 दिवसांनी पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनाही कोरोना संसर्ग झाला आहे.

जगभरात कोरोना संक्रमनाची दुसरी लाट जोर धरत असताना, पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष डॉ. आरिफ अल्वी हे सुद्धा कोरोना बाधित झाले आहेत. त्यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली आहे. चीनच्या एका वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे राष्ट्रपती आणि त्यांची पत्नी समिना अल्वी यांना चीनच्या सायनोफॉर्म या कोरोना लसीचे लसीकरण केले होते. त्याचवेळी पंतप्रधान इम्रान खान कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर 10 दिवसांनी पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनाही कोरोना संसर्ग झाला आहे. (President of pakistan tested corona positive) 

कोरोना बाधित झाल्याची माहिती देताना पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अल्वी (President of Pakistan) यांनी ट्विटरवरून माहिती देताना, आपली  कोरोना चाचणी सकारात्मक आली असल्याचे सांगितले. तसेच आपण कोरोना लसीचा पहिला डोस घेतला असून, दुसरा डोस सुद्धा घेणार आहोत. यापूर्वी 20 मार्च रोजी पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते, त्यानंतर त्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवले आहे. विशेष म्हणजे  पंतप्रधान इम्रान खान यांना देखील कोरोनाची लागण होण्याच्या केवळ दोन दिवस आधी त्यांनाही चिनची कोरोना लस (Corona Vaccine) देण्यात आली होती. (President of pakistan tested corona positive )

इम्रान खान यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर पाकिस्तानच्या (Pakistan) राष्ट्रीय आरोग्य सेवा मंत्रालयाने पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना पूर्ण लसीकरण झाले नसल्याचे स्पष्ट केले होते. मंत्रालयाने त्यावेळी असे सांगितले होते की, इम्रान खान यांनी लसीचा पहिला डोस सुमारे दोन दिवसांपूर्वी घेतला होता, मात्र कोविड लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर दोन ते तीन आठवड्यांनंतर अँटीबॉडी  विकसित होते.

नेपाळ सरकारवर हवेच्या प्रदूषणामुळे ओढवली वेगळीच नामुष्की; वाचा संपूर्ण प्रकरण

संबंधित बातम्या