‘विस्तारवादाची इच्छा नाही’: जिनपिंग

क्रीडा प्रतिनिधी
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

एाकाधिकारशाही, विस्तारवाद किंवा प्रभावक्षेत्र निर्माण करण्याची चीनची कोणतीही इच्छा नसल्याचे आणि आम्ही त्या दिशेने कधीही जाणार नाही, असा दावा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत बोलताना केला.

न्यूयॉर्क : एाकाधिकारशाही, विस्तारवाद किंवा प्रभावक्षेत्र निर्माण करण्याची चीनची कोणतीही इच्छा नसल्याचे आणि आम्ही त्या दिशेने कधीही जाणार नाही, असा दावा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत बोलताना केला. चीनवर विस्तारवादाचा आरोप होत असताना जिनपिंग यांनी आपली भूमिका जगासमोर मांडली आहे. 

जिनपिंग म्हणाले,‘‘आम्हाल कोणत्याही देशाबरोबर ‘कोल्ड वॉर’ किंवा ‘हॉट वॉर’ करण्याची इच्छा नाही. इतरांबरोबर असलेले वाद कमी करण्यासाठी आम्ही कायमच चर्चेचा मार्ग अनुसरत आलो आहे. आम्ही भविष्यात कधीही एकाधिकारशाही, विस्तारवाद किंवा प्रभावक्षेत्र निर्माण करण्याचा प्रयत्न करणार नाही. चीनला विकास करायचा आहे आणि तो बंद दाराआड नव्हे, तर सर्व जगासमोर करायचा आहे. सर्वांशी सहकार्य करूनच पुढे जाण्याचे आमचे उद्दीष्ट असून यातच चीनचाही आर्थिक विकास होणार आहे.’’

कोरोनासाठी चीनला जबाबदार धरण्याची मागणी अमेरिकेने केल्यानंतर जिनपिंग यांनी टीका केली. ‘मोठ्या देशांनी मोठ्या देशांसारखेच वागावे. दोन संस्कृतींमधील संघर्ष टाळायला हवा. आर्थिक जागतिकीकरण हे वास्तव असल्याचे मान्य करायला हवे,’ असे जिनपिंग म्हणाले.

संबंधित बातम्या