भारतातीतल नव्या कोविड विषाणू विरोधात प्रतिबंधात्मक लस खूपच प्रभावी : ब्रिटिश रिसर्च 

Vaccination.jpg
Vaccination.jpg

लंडन :  भारतात आढळून आलेल्या कोविड 19 (Covid 19)  चा नवा विषाणू (New variant)  बी1.617.2 च्या विरोधात  प्रतिबंधात्मक लस (Preventive vaccine)  खूपच प्रभावी असल्याचे एका संशोधनात आढळून आले आहेत.  इंग्लंडच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने (Department of Public Health of England)  याबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. फाइजर/ बायोएनटेक लस दुसऱ्या डोसच्या दोन आठवड्यांनंतर बी 1.617.2 विषाणू विरूद्ध 88% प्रभावी आहे. तर ऑक्सफोर्ड / एस्ट्रोजेनिका लस या स्वरूपाच्या विरूद्ध 60 टक्के प्रभावी असल्याची बाब या संशोधनात आढळून आली आहे.  विशेष म्हणजे दोन्ही लसी पहिल्या डोसनंतर 33 टक्के प्रभावी होत्या, असेही या संशोधनात समोर आले आहे.  तर या दोन्ही कोविड 19 प्रतिबंधक लसीचे दोन डोस भारतात नव्याने दाखल झालेल्या कोरोना विषाणू बी 1.1.7 च्या विरुद्ध 50 टक्के  विरूद्ध अत्यंत प्रभावी असल्याचेही इंग्लंडच्या  सार्वजनिक आरोग्य विभागाने या अहवालात नमूद केले आहे. (Preventive vaccine against new covid virus in India is very effective: British research)

भारतात कोविड 19 विरोधात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ऑक्सफोर्ड / एस्ट्रोजेनिकाची  कोविशील्ड लस लसीकरण मोहिमेत वापरली जात आहे. याबाबत ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी भाष्य केले आहे.  आपल्या प्रियजणांना कोविड पासून वाचविण्यासाठी या लसी किती महत्त्वाच्या आहेत, हे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.  कोविड -19 आणि  त्याच्या इतर प्रकारांच्या विषणूनपासून प्रभावी संरक्षणासाठी लसीचा दुसरा डोस  अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी नागरिकांना लसीकरणासाठी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.  

बी 1.617.2 विषाणूच्या संशोधनात  5 एप्रिलपासून सर्व वयोगटातील लोकांचा डेटा समाविष्ट केला गेला आहे.  केंटमध्ये आढळून आलेल्या  विषाणू बी 1.1.7 व्हेरिएंटच्या विरूद्ध, लसीचे  दोन डोस अत्यंत  प्रभावी आहेत आणि तितकेच बी 1.617.2  या व्हेरिएंटच्या विरूद्धही लसीचे दोन्ही डोस प्रभावी आहेत. ब्रिटनमध्ये बी 1.1.7 या विषाणूमुळे  सर्वाधिक लोकांना लागण झाली. मात्र फायझर लसीचे दोन डोस बी 1.1.7 या  विषाणूच्या विरूद्ध 93 टक्के प्रभावी ठरले तर तर ऑक्सफोर्ड / एस्ट्रोजेना लस या स्वरूपाच्या विरोधात  66 टक्के प्रभावी ठरली.  असेही मॅट हॅनकॉक यांनी म्हटले आहे. 

त्याचबरोबर,  या दोन्ही लसीचा एक डोस बी 1.1.7 या विषाणूच्या विरोधात 50 टक्के प्रभावी आहे.  इंग्लंडचे लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. मेरी रॅमसे यांनी देखील याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.  कोणत्याही लसीच्या दोन डोसमुळे कोरोना विषाणूच्या  बी 1.617.2 पासून उच्च प्रमाणात संरक्षण मिळते, असेही या संशोधनातून समोर आले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com