भारत आणि बांगलादेश यांचा वारसा एकच - पंतप्रधान  शेख हसीना 

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 26 मार्च 2021

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोनाच्या काळानंतर पहिल्यांदाच बांगलादेशच्या परदेश दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा दोन दिवसांचा आहे. त्यानंतर ढाका येथील राष्ट्रीय परेड मैदानात बांगलादेशच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासमवेत सहभागी झाले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोनाच्या काळानंतर पहिल्यांदाच बांगलादेशच्या परदेश दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा दोन दिवसांचा आहे. त्यानंतर ढाका येथील राष्ट्रीय परेड मैदानात बांगलादेशच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासमवेत सहभागी झाले. यावेळी नरेंद्र मोदींनी सर्व भारतीयांच्या वतीने बांगलादेशातील सर्वांचे मनापासून अभिनंदन करत असल्याचे सांगितले. याशिवाय, बांग्लाबंधू शेख मुजीबुर रहमान यांना नरेंद्र मोदींनी श्रद्धांजली वाहिली. तर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारत-बांग्लादेश सहयोगी दलांच्या संयुक्त कारवाईद्वारे अंतिम विजय 16 डिसेंबर 1971 रोजी प्राप्त झाल्याचे सांगितले. (Prime Minister of Bangladesh Sheikh Hasina said India and Bangladesh share the same heritage)

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेशच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमात बोलताना, बांगलादेशच्या सैनिकांसह भारतीय सैन्याने देखील आपले बलिदान दिल्याचे नमूद केले. याशिवाय भारतीय सैन्याने दिलेला त्याग आपल्याला मोठ्या सन्मानाने आठवत असल्याचे त्या म्हणाल्या. त्यानंतर, पाकिस्तानी सैनिकांकडून झालेल्या छळ, नरसंहार आणि बलात्काराच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशातून पळून गेलेल्या सुमारे दहा कोटी लोकांना भारताने आश्रय दिल्याची कृतज्ञता शेख हसीना यांनी व्यक्त केली. इतकेच नाही तर, भारताने त्यांना निवारा, भोजन आणि औषधे दिल्याचे सांगत, बांगलादेशच्या स्वातंत्र्यसैनिकांना सर्व प्रकारच्या सहकार्याने मदत केली असल्याचे त्यांनी सांगितले. 

फायझरची मोठी घोषणा; 12 वर्षांखालील मुलांना दिले जाणार लसीचे डोस

याव्यतिरिक्त, शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी भारत हा फक्त आपला शेजारी देशच नसून, भारत आणि बांगलादेश यांच्यातील ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक वारसा आणि भौगोलिक संबंध एकच असल्याचे सांगितले. यानंतर शेख हसीना यांनी 1971 मध्ये झालेल्या बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धात भारतातील लोक (India) आणि सरकार मोठ्या प्रमाणात सामील असल्याचे म्हणत याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले. 

दरम्यान, यापूर्वी बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करत कोरोनाच्या संकटात भारताने जागतिक स्तरावर केलेल्या लस वितरणाचे कौतुक केले. तर बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री एके अब्दुल मोमीन यांनी भारताने बांगलादेशला लस उपलब्ध करून देत लोकांची मने जिंकली असल्याचे म्हटले.     

संबंधित बातम्या