बोरिस जॉन्सन यांची मोठी घोषणा, ब्रिटनमध्ये मास्क घालण्यावरील निर्बंध हटवले !

ब्रिटनचे (Britain) पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी बुधवारी जगभरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात मास्क अनिवार्य घालण्यासह निर्बंध हटवण्याची घोषणा केली आहे.
Boris Johnson
Boris JohnsonDainik Gomantak

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी बुधवारी जगभरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात मास्क अनिवार्य घालण्यासह निर्बंध हटवण्याची घोषणा केली आहे. ब्रिटनमध्ये पुढील गुरुवारपासून, मास्क परिधान अनिवार्य करण्यासह, कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेले इतर अतिरिक्त निर्बंध हटवले जातील. (Prime Minister Boris Johnson Has Announced That Britain Has lifted The Ban On Wearing Masks)

जॉन्सन (Boris Johnson) म्हणाले की, ब्रिटनमधील (Britain) नागरिकांना 'कोविड प्लॅन-बी' अंतर्गत लादलेल्या या निर्बंधांमधून सूट दिल्यानंतर 'घरुन काम' करण्यास सांगण्यात येणार नाही. तसेच मोठ्या मेळाव्यादरम्यान कोविड-लसीकरण प्रमाणपत्राची आवश्यकता देखील राहणार नाही. लोकांना सर्वत्र मास्क परिधान करण्यापासून सूट दिली जाईल, तथापि, मास्क घालण्याचा निर्णय लोकांच्या विवेकावर सोडण्यात आला आहे. यासोबतच, लवकरच शालेय वर्गात अनिवार्यपणे मास्क घालण्यावर बंदी असणार आहे.

Boris Johnson
10, 000 चिनी नागरिकांना मायदेशी परतण्यास पाडले भाग

दरम्यान, ब्रिटनच्या पंतप्रधानांनी संसदेत सांगितले की, नव्या आकडेवारीवरुन असे दिसून येते की ओमिक्रॉन रुग्णांची संख्या देशात झपाट्याने वाढलेली दिसून येते. त्यानंतर कोरोना निर्बंध शिथिल केले जात आहेत. ते पुढे म्हणाले, “म्हणून, आज सकाळी मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे की बूस्टर डोसची मोहीम देशभरात राबविण्यात येणार आहे. प्लॅन-बी च्या उपायांना मिळालेला जनतेचा प्रतिसाद पाहता, आम्ही पुढील आठवड्यापासून प्लॅन-ए वर परत जाऊ शकतो.

जॉन्सन म्हणाले की, कोरोना विषाणूची लागण झाल्यास सेल्फ-आयसोलेशनचा अनिवार्य कायदाही 24 मार्चपासून रद्द करण्यात येईल. गेल्या काही दिवसांपासून देशात संसर्गाची प्रकरणे कमी होत आहेत. मात्र, मंगळवारीही देशभरात 94 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

शिवाय, ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर ब्रिटनने गेल्या वर्षी 8 डिसेंबर रोजी देशात प्लॅन-बी लागू केला होता. ज्यामध्ये अनेक निर्बंध पुन्हा लादले गेले होते. ते पुढे म्हणाले की, सोमवारपासून सेल्फ आयसोलेशनचा कालावधी 7 दिवसांवरुन 5 दिवसांवर आणण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी, विशेषत: जिथे तुम्ही अनोळखी लोकांना भेटत असाल तिथे मास्क घालण्याची सूचना देखील देण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com