लॉकडाऊन नंतर पंतप्रधान मोदी यांचा पहिलाच विदेश दौरा

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 26 मार्च 2021

कोरोना काळात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे थांबले होते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्यासाठी वेगवगेळ्या देशांचे दौरे करत असतात. मात्र कोरोना काळात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दौरे थांबले होते. त्यानंतर आता पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे परदेश दौऱ्यावर गेले आहेत. बांग्लादेशच्या स्वतंत्रदिनाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी, नरेंद्र मोदी यांनी दाऊदी बोहरा समाजाची देखील भेट घेतली असल्याची माहिती मिळाली आहे. (Prime Minister Modi's first foreign tour after lockdown) 

बांगलादेशच्या (Bangladesh) सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बांगलादेश दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राजधानी ढाका शहरातील राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देऊन त्याठिकाणी वृक्षारोपण केले. तसेच स्मारकाच्या विशेष व्हिजिटर्स डायरीमध्ये संदेश देखील लिहिला. त्यानंतर ढाका शहरातील एका हॉटेल मध्ये जाऊन त्यांनी दाऊदी बोहरा समाजाच्या काही प्रमूख मंडळींची भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजधानी ढाका (dhaka) मध्ये आगमन होताच त्यांच्या स्वागतासाठी बंगालच्या पंतप्रधान शेख हसीना या स्वतः उपस्थित होत्या. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुत्सद्देगिरीमुळे, आम्ही सर्व महत्त्वपूर्ण मुद्दे आता संवाद आणि चर्चेच्या माध्यमातून सोडवित आहोत, असे मत बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री अब्दुल ओमन यांनी व्यक्त केले.

हॉलिवूड स्टार जेसिका वॉल्टरने घेतला जगाचा निरोप

संबंधित बातम्या