VIDEO: PM मोदींचे दक्षिण आफ्रिकेत जंगी स्वागत, लहान मुलाच्या डोक्यावर हात ठेवून...

BRICS Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग शहरात पोहोचले. वॉटरक्लूफ एअर फोर्स बेस येथे उपाध्यक्ष पॉल मॅशाटाइल यांनी स्वागत केले.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra ModiDainik Gomantak

BRICS Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग शहरात पोहोचले. वॉटरक्लूफ एअर फोर्स बेस येथे उपाध्यक्ष पॉल मॅशाटाइल यांनी स्वागत केले. पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

ते आज ब्रिक्स बिझनेस फोरम लीडर्स डायलॉग आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष रामाफोसा यांनी आयोजित केलेल्या डिनरला उपस्थित राहतील. पंतप्रधान मोदी 24 ऑगस्टपर्यंत तीन दिवस दक्षिण आफ्रिकेत राहणार आहेत. यानंतर ते ग्रीसला जाणार आहेत.

पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत करण्यात आले

विमानतळावर पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत करण्यात आले. भारतीय डायस्पोराने भारत माता की जय आणि वंदे मातरमचा जयघोष केला. यादरम्यान पीएम मोदींना भेटण्याची प्रत्येकांना ओढ लागली.

पंतप्रधानांनी गर्दीत उभ्या असलेल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून आशिर्वाद दिला. पंतप्रधान मोदी येथून सँडटन सन हॉटेलमध्ये मुक्काम करतील. यावेळी, पंतप्रधानांचे जंगी स्वागत करण्यात आले. हॉटेलबाहेरही अनेक अप्रवासी भारतीय उपस्थित होते.

एका महिलेने सांगितले की, पंतप्रधानांच्या उपस्थितीत असणे हा खरोखरच सन्मान आहे. ते एक अद्भुत व्यक्ती आहेत.

Prime Minister Narendra Modi
BRICS Summit: मोदींच्या अध्यक्षतेखाली पाच देशांची बैठक, अफगाणिस्तानवर होणार चर्चा

जिनपिंग आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्षही आले

BRICS हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश असलेला जागतिक अर्थव्यवस्थांचा समूह आहे. पंतप्रधान मोदींपूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला डी सिल्वा जोहान्सबर्गला पोहोचले आहेत.

पंतप्रधान मोदींचा हा तिसरा दक्षिण आफ्रिका दौरा असेल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या 30 व्या वर्धापन दिनानिमित्त ही भेट आहे.

Prime Minister Narendra Modi
BRICS Meeting: एनएसए अजित डोवाल यांनी बैठकीत अफगाण संकटाचा मुद्दा केला उपस्थित

ब्रिक्स बिझनेस फोरम संबोधित करेल

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची पंतप्रधान मोदींसोबत जोहान्सबर्गला पोहोचले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) भारतीय डायस्पोराशी पंतप्रधान संवाद साधणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यानंतर ते ब्रिक्स बिझनेस फोरमला संबोधित करतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com