प्रिन्स फिलिप यांचं वयाच्या 99 व्या वर्षी दुःखद निधन

प्रिन्स फिलिप यांचं वयाच्या 99 व्या वर्षी दुःखद निधन
Prince Philip dies tragically at the age of 99

ब्रिटनची दुसरी राणी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलीप यांचं दुःखद निधन झालं आहे. यासंदर्भातील माहीती बकिंगहॅम पॅलेसकडून देण्यात आली आहे. राणी एलिझाबेथ यांच्याशी प्रिन्स फिलीप यांचा विवाह 1947 मध्ये झाला होता. ब्रिटीश राजघराण्यातील सर्वाधिक काळ व्यतीत केलेले पती पत्नी होते.

आठवड्यापूर्वीच प्रिन्स फिलिप रुग्णालयामधून बंकिमहॅम पॅलेसमध्ये परतले होते. त्यांच्यावर ह्रदयाची शस्त्रक्रीया करण्यात आली होती. महिनाभर त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. मात्र आज अखेर ते स्वर्गवासी झाले. ''अतिशय खेदाने राणी एलिझाबेथ हे जाहीर करत आहे की, त्यांचे पती प्रिन्स फिलिप यांचे आज सकाळी विंडसर कॅसेलमध्ये निधन झालं आहे,’’ असं बंकिमहॅम पॅलेसकडून जाहीर करण्यात आलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे. (Prince Philip dies tragically at the age of 99)

प्रिन्स फिलीप आणि राणी एलिझाबेथ यांना चार पुत्र, आठ नातू आणि 10 पणतू आहेत. प्रिन्स फिलिप यांचा जन्म 10 जून 1921 रोजी झाला होता. राणी एलिझाबेथ ब्रिटनच्या राणी होण्याआगोदर 5 वर्ष आधी त्यांचा विवाह झाला होता. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com