नवाल्नींच्या उपोषणात अडथळा आणण्यासाठी भाजलं चिकन

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

रशियातील राजकीय विरोधक अॅलेक्सी नवाल्नी यांची प्रकृती उपोषणामुळे बिघडली असल्याचे सांगण्यात येत आहे.  पाठ आणि पायाच्या दुखण्यावर योग्य उपचार मिळत नसल्याचा दावा करीत नवाल्नी यांनी उपोषणाचा मार्ग स्विकारला आहे.

मास्को: रशियाचे विरोधी पक्षनेते अलेक्सी नवाल्नी तुरुंगात आहेत. 17 जानेवारी रोजी बर्लिनला उपचार घेतल्यानंतर ते आपल्या देशात परत आले होते, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर पॅरोलच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्याच वेळी नेवाल्नी यांनी पुतीनवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, तुरूंगात  असलेल्या नेवाल्नींची प्रकृती सतत खालावत असल्याची बातमी येत आहे.

रशियातील राजकीय विरोधक अॅलेक्सी नवाल्नी यांची प्रकृती उपोषणामुळे बिघडली असल्याचे सांगण्यात येत आहे.  पाठ आणि पायाच्या दुखण्यावर योग्य उपचार मिळत नसल्याचा दावा करीत नवाल्नी यांनी उपोषणाचा मार्ग स्विकारला आहे.  दिवसागणिक एका किलोने त्यांचे वजन घटते आहे. दरम्यान नवाल्नी यांना योग्य उपचार मिळत नसल्याचा दावा गेल्या आठवड्यातच रशियन कारागृह अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे.

महिलांच्या कपड्यांमुळेच होतात बलात्कार पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं वादग्रस्त वक्तव्य 

गुरुवारी रशियाचे विरोधी पक्षनेते अलेक्सी नवाल्नी यांच्या वकिलांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली. तुरुंगात त्याच्या क्लायंटची प्रकृती खालावत आहे, त्यांना पाठीच्या आणि पायांच्या दुखण्याची समस्या भेडसावत आहे, नवाल्नींची प्रकृती अलीकडील काळात गंभीररीत्या ढासळली आहे, असे वकील ओल्गा वेल्कोवा यांनी सांगितले. 

उजव्या पायाचा खालचा भाग 'बधिर'

नेवाल्नी यांना पाठीच्या आणि उजव्या पायाच्या दुखण्याचा त्रास होत आहे. त्याच्या उजव्या पायाच्या खालच्या भाग 'असंवेदनशील' झाला आहे. 20 ऑगस्टला 'नर्व्ह एजंट' विषाच्या हल्ल्यानंतर नेवाल्नी  गंभीर आजारी पडले आहे. ते उपचारांसाठी जर्मनीला गेले झाले होते. पाच महिन्यांनंतर, जेव्हा ते बर्लिनहून मॉस्कोला परत आले, तेव्हा त्यांना शेरेमेत्येवो विमानतळावर अटक करण्यात आली आणि त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला.

अमेरिकेने दिली प्रतिक्रिया

नेवाल्नींच्या सुटकेसाठी रशियामध्ये मोठ्या संख्येने निदर्शने होत आहेत, ज्यामध्ये 10,000 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय नेवाल्नींच्या अटकेबाबत क्रेमलिनवर युरोप आणि अमेरिकेसह अनेक देश टीका करत आहेत. व्हाइट हाऊसतर्फे नवाल्नी यांची प्रकृती ढासळत असल्याचे वृत्त त्रासदायक आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. 

नवाल्नींच्या बाजूला भाजतात चिकन
नवाल्नी 44 वर्षांचे असून गेल्या आठवड्यापासून त्यांनी उपोषण सुरु केले. त्यांच्या या उपोषणात अडथळा आणण्यासाठी तुरुंगातील अधिकारी आपल्याजवळ चिकन भाजतात आणि खिशांमध्ये मिठाई ठेवतात असा आरोप नवाल्नी यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून केला आहे.

संबंधित बातम्या