"प्रियंकाने लॉकडाऊनच्या नियमांना दिली तिलांजली"

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 9 जानेवारी 2021

 ब्रिटन सरकारने कोरोनाच्या नव्या प्रसार रोखण्यासाठी पुन्हा एखदा लॉकडऊन जाहीर केला आहे. लंडन शहरात लॉकडऊनचे नियम लागू असताना प्रसिध्द अभिनेत्री प्रियंका चोप्राने नियम धाब्यावर बसवले असं सांगण्यात येत आहे.

ब्रिटन : ब्रिटन सरकारने कोरोनाच्या नव्या प्रसार रोखण्यासाठी पुन्हा एखदा लॉकडऊन जाहीर केला आहे. लंडन शहरात लॉकडऊनचे नियम लागू असताना प्रसिध्द अभिनेत्री प्रियंका चोप्राने नियम धाब्यावर बसवले असं सांगण्यात येत आहे.

युरोपात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे हाहाकार माजला आहे.पुन्हा एखदा कडक लॉकडऊन जाहीर करण्याची वेळ ब्रिटन सारख्या देशावर आली आहे.लंडनमध्ये लॉकडऊन सुरु असतानाच्या काळात प्रियंका चोप्रा आपल्या आईसोबत एका सलून गेली होती.
प्रियंकाला पाहताचं क्षणी पोलीसांनी धाव घेत कोरोना नियमांची आठवण करून देत समाचार घेतला.त्यानंतर नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला प्रियंकाला सामोरं जाव लागलं.मात्र प्रियंकाने यासंबधीचं स्पष्टीकरण दिले आहे.प्रियंका आपल्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरणासाठी युकेमध्ये थांबली आहे.तिने या चित्रपटासाठी केसांना कलर केला आहे.त्यामुळे तिला सलून मध्ये जावं लागलं होतं.सलूनमध्ये योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.कोरोना नियमांच पालन करण्यात येत आहे. तसेच सलूनमध्ये कोरोनाची चाचणी ही करण्यात आली असल्याचं ही यावेळी प्रियंकाने सांगितले.

दरम्यान प्रियंकाला पाहून पोलीस सलूनमध्ये पोहचल्यावर योग्य ती कागदपत्रे दाखवण्यात आलं असल्याचं म्हटलं जात आहे.प्रियंका लवकरचं 'टेक्स्ट फॉर यू' या हॉलीवूड चित्रपटात झळकणार आहे.त्यामुळे या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये आहे.मात्र चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आल्याने परिणामी प्रियंका लंडनमधीच अडकून पडली आहे.

संबंधित बातम्या