वुहानच्या लॅबमध्ये कोरोना विषाणूची निर्मिती; शास्त्रज्ञांनी केला खुलासा

wuhan.jpg
wuhan.jpg

जगभरात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला असताना कोरोना विषाणूची निर्मिती कशी झाली याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यात आता ब्रिटनचे प्रोफेसर अ‍ॅंगल डल्गलिश (Angle Dalglish) आणि शास्त्रज्ञ डॉ. बिर्गर (Scientist Dr. Birger) यांनी कोरोना विषाणूची निर्मिती चीनच्या वुहान शहारातील लॅबमध्येच (Wuhan city) झाली असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी त्यांनी कोरोना विषाणूच्या संदर्भात सखोल अभ्यास केला आहे. या अभ्यासाअंती त्यांनी या धक्कादायक गोष्टींचा उलगडा झाला असल्याचा दावा आपल्या अहवालादरम्यान केला आहे. कोरोना विषाणू तयार केल्यानंतर तो लपवण्यासाठी चीनकडून रेट्रो इंजिनियरिंगचा वापर करण्यात आला होता. तसेच हा विषाणू मानवनिर्मित नसून वटवाघुळातून पसरला असल्याचं भासवलं गेलं होतं. मात्र मानवी हस्तक्षेपाशिवाय कोणताही विषाणू तयार होऊच शकत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. याआगोदर चीनकडे अनेकदा संशयाने पाहण्यात आले आहे.  (Production of corona virus in Wuhans lab Scientists have revealed)

कोरोना विषाणूचे कोणतेही नैसर्गिक स्वरुपाचे गुणधर्म नाहीत. त्यामुळे हा विषाणू पूर्णपणे मानवनिर्मित असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच 'गेन ऑफ फंक्शन' या प्रकल्पामध्ये याची निर्मिती केली गेली आहे. चीनने गुहेतील वटवाघुळामधून कोरोनाचा बॅकबोन घेतला आणि त्यावर स्पाईक टाकून त्या विषाणूला अधिक घातक बनवलं. त्यामुळे त्या विषाणूमध्ये मानवी हस्तक्षेप असल्याचे काही  गुणधर्म आढळून आले आहेत. तो लॅबमध्येच तयार केला असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे. कोरोनाची लस निर्मितीसाठी अभ्यास करताना हा खुलासा झाला आहे. याबाबतचं वृत्त डेली मेलनं दिलं आहे.

वुहानमधील लॅबमध्ये जाणीवपूर्वक माहिती लपवली गेली आणि नंतर ती नष्ट करण्यात आली. तसेच ज्या शास्त्रज्ञांनी यावर आवाज उठवला त्यांना चीनी सरकारकडून गप्प केलं गेलं किंवा त्यांना गायब करण्यात आलं. त्यामुळे चीनंच पितळ उघडं पडलं नाही असंही त्यांनी पुढे सांगितले आहे. 

WHO च्या टीमनं जानेवारी महिन्यात वुहानचा दौरा केला होता. तेव्हा त्या टीमने कोरोना विषाणूची निर्मिती नैसर्गिकरित्या झाल्याचा दावा केला  होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com