पैगंबर वादाचे अमेरिकेतही पडसाद: 'भारताने मानवाधिकारांचा आदर करावा'

प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका कडून एक विधान आले आहे.
पैगंबर वादाचे अमेरिकेतही पडसाद: 'भारताने मानवाधिकारांचा आदर करावा'
America On Nupur Sharma RowDainik Gomantak

प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) कडून एक विधान आले आहे. नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा अमेरिकेने निषेध केला आहे. त्याचवेळी या दोन नेत्यांवर झालेल्या कारवाईबद्दल भाजपने आनंद व्यक्त केला आहे. नुपूर आणि नवीनच्या कमेंटनंतर देशासह विदेशातही खळबळ उडाली आहे. परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी दोन्ही नेत्यांच्या टिप्पणीवर टीका केली आहे. (America On Nupur Sharma Row)

'भाजपच्या दोन अधिकाऱ्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा आम्ही निषेध करतो, पण पक्षाने त्या टिप्पण्यांचा जाहीर निषेध केला हे जाणून आम्हाला आनंद होत आहे, धर्म किंवा श्रद्धा स्वातंत्र्यासह मानवी हक्कांच्या प्रश्नांवर आम्ही भारत सरकारशी वरिष्ठ स्तरावर नियमितपणे संवाद साधतो आणि आम्ही भारताला मानवाधिकारांचा आदर करण्यासाठी प्रोत्साहित करतो,' असे नेड प्राइस यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

America On Nupur Sharma Row
प्रेषित मोहम्मद आक्षेपार्ह वक्तव्य : नुपूर शर्मा यांच्या अडचणी वाढल्या

अमेरिकेला याचा आनंद आहे

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर भाजपच्या माजी प्रवक्ता नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशात आणि परदेशात खळबळ उडाली होती. यानंतर भाजपने आपल्या नेत्यांवर कारवाई केली आणि भाजपने त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी एका निवेदनात म्हटले होते की, भाजप कोणत्याही धर्म किंवा धर्माशी संबंधित व्यक्तीबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध करतो. याप्रकरणी अमेरिकेने मोदी सरकारबद्दल आनंद व्यक्त करत भाजपने केलेल्या कारवाईचे कौतूक केले आहे.

नुपूर आणि नवीन यांची हकालपट्टी केल्यानंतर भाजपचे वक्तव्य

भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह म्हणाले की, पक्ष कोणत्याही धर्माचा किंवा समुदायाचा अपमान करणाऱ्या विचारसरणीच्या विरोधात आहे. भाजप अशा विचारसरणीचे समर्थन करत नाही. भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात प्रत्येक धर्माचा चांगलाच विकास झाला आहे. भाजप सर्व धर्मांचा आदर करते.

America On Nupur Sharma Row
नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पाकिस्तानमध्ये उठला आवाज, मौलानांनी मुस्लिमांवर केला आरोप

अमेरिकेपूर्वी अनेक इस्लामिक देशांनी या प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. यापैकी अनेक देश होते ज्यांचे भारताशी संबंध जवळचे मानले जातात. बांगलादेशात निदर्शने करणाऱ्या लोकांनी पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडून औपचारिक निषेधाची मागणी केली होती. अमेरिकेपूर्वी कतार, इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया, पाकिस्तानसह अनेक इस्लामिक देशांनी पैगंबरावरील वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com