कोरोना निर्बंधांविरुद्ध बर्लिन, पॅरिस, झुरीचमध्ये निदर्शने

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

पॅरिसमधील निदर्शकांनी वैद्यकीय जुलूम थांबवा, सक्तीचे लसीकरण नकोच, मास्क हे तर जनावराच्या जबड्यावरील जाळी असे फलक झळकाविले. मास्क न घातलेल्या निदर्शकांना पोलिसांनी प्रत्येकी 135 युरो (160 डॉलर) इतका दंड केला.

बर्लिन: मास्कचा वापर अनिवार्य अशा व इतर कोरोना निर्बंधांच्या विरोधात युरोपमधील प्रमुख शहरांत जोरदार निदर्शने झाली.

बर्लिनमधील मोर्चा पोलिसांनी रोखला. ब्रँडेनबर्ग गेट या जगप्रसिद्ध स्थळी सुमारे 18 हजार लोक जमले होते. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यामुळे पोलिसांनी त्यांना रोखले. न्यायालयीन लढाईनंतरच या मोर्चाला परवानगी मिळाली होती. वारंवार विनंती केल्यानंतरही निदर्शकांनी एकमेकांत किमान अंतर राखले नाही. त्यामुळे पोलिसांनी सभा थांबवली. पोलिसांनी सुमारे तीनशे लोकांना अटक केली. एका गटाने पोलिसांच्या दिशेने बाटल्या, दगड फेकले.

स्वित्झर्लंडमधील झुरीच आणि इंग्लंडमधील लंडन येथेही मोर्चे काढण्यात आल्याचे वृत्त आहे. पॅरिसमधील समाजशास्त्राचा विद्यार्थी अनैस याने सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचे उपयोग शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले नाहीत.

वैद्यकीय जुलूम थांबवा
पॅरिसमधील निदर्शकांनी वैद्यकीय जुलूम थांबवा, सक्तीचे लसीकरण नकोच, मास्क हे तर जनावराच्या जबड्यावरील जाळी असे फलक झळकाविले. मास्क न घातलेल्या निदर्शकांना पोलिसांनी प्रत्येकी 135 युरो (160 डॉलर) इतका दंड केला.

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या