'पबजी' खेळणारे खुश...!; कंपनी पुन्हा भारतात परतण्याच्या तयारीत

गोमंतक ऑनलाईन टीम
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

पबजी मोबाईल 2020च्या शेवटपर्यंत भारतात पुन्हा परतणार आहे. पबजी कंपनीतर्फे मात्र तसे काही सांगण्यात आले नसून आज यावर पबजी कॉर्पोरेशन घोषणा करेल, अशी चर्चा आहे.

पबजी मोबाईल आणि पबजी मोबाईल लाईट वर सप्टेंबरमध्ये भारत सरकारने प्रतिबंध लावले होते. त्यानंतर 30 ऑक्टोबरला पबजीने भारतातून आपला गाशा गुंडाळला होता. त्यांनी भारतातील आपले सर्व्हरही बंद केले होते. मात्र, आता डिसेंबरमध्ये नवीन व्हर्जनसह पबजी पुन्हा भारतात लॉन्च होणार आहे. 

इंग्रजी टेक वेबसाईट द क्रंचच्या रिपोर्टनुसार पबजी मोबाईल 2020च्या शेवटपर्यंत भारतात पुन्हा परतणार आहे. पबजी कंपनीतर्फे मात्र तसे काही सांगण्यात आले नसून आज यावर पबजी कॉर्पोरेशन घोषणा करेल, अशी चर्चा आहे. या टेक माध्यमाच्या रिपोर्टनुसार कंपनी भारतात परतण्यासाठी ग्लोबल क्लाउड सर्विस प्रोवाइ़डरशी चर्चा करत असून याशिवाय काही स्ट्रिमर्सशीही चर्चा सुरू आहे.   

भारतातील कार्यालयासाठी लिंकडीनवर नवीन जागांसाठी मागवले अर्ज 

पबजी कॉर्पोरेशनने नुकतीच भारतातील कार्यालयात भरण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लिंकडीनवर जाहिरात दिली असून कॉर्पोरेट डेव्हलपमेंट डिव्हीजन मॅनेजर पदासाठी अर्जही मागवले आहेत. या जागेसाठी त्यांनी ५ वर्षांचा अनुभव अनिवार्य केला आहे. सप्टेबंरमध्येच पबजी कॉर्पोरेशनने चीनची गेम डेव्हलप करणारी कंपनी टेसेंट गेम्स यांच्याशी करार रद्द करण्याचा  निर्णय घेतला होता. त्यानंतरच त्यांच्या भारतात परतण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. 
 

संबंधित बातम्या