'आम्हीही एक मुस्लिम देश आहोत'; तालिबानच्या निर्णयांवर भडकला कतार

अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबानचा (Taliban) कब्जा झाल्यानंतर मध्य पूर्वचा मुख्य देश असलेल्या कतारने (Qatar) त्यांना पाठिंबा दिला.
'आम्हीही एक मुस्लिम देश आहोत'; तालिबानच्या निर्णयांवर भडकला कतार
Sheikh Mohammed bin Abdul Rahman Al ThaniDainik Gomantak

अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबानचा (Taliban) कब्जा झाल्यानंतर मध्य पूर्वचा मुख्य देश असलेल्या कतारने (Qatar) त्यांना पाठिंबा दिला. परंतु आता कतार तालिबानवर चांगलाच भडकला आहे. मुलींच्या शिक्षणाबाबत तालिबानचा दृष्टिकोन अत्यंत निराशाजनक असल्याचे कतारच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे. अशा बुरसटेलेल्या विचारांमुळे अफगाणिस्तान आणखी मागे जाईल, असेही ते यावेळी म्हणाले. कतारचे परराष्ट्र मंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी (Sheikh Mohammed bin Abdul Rahman Al Thani) म्हटले की, जर तालिबानला खरोखरच आपल्या देशात इस्लामिक व्यवस्था राबवायची असेल तर तालिबानने कतारकडून शिकले पाहिजे.

अब्दुल रहमान अल थानी (Sheikh Mohammed bin Abdulrahman Al Thani) युरोपियन परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेफ बोरेल यांच्याशी बातचीत करताना म्हणाले की, अफगाणिस्तानमध्ये अलीकडे ज्या प्रकारची पावले उचलली गेली ती दुभाग्यपूर्ण आहेत. अफगाणिस्तान विकासाच्या मार्गाने खूप पुढे जाऊ शकतो, म्हणून अशी काही पावले उचलली आहेत हे म्हणणे अत्यंत निराशाजनक आहे.

Sheikh Mohammed bin Abdul Rahman Al Thani
अशरफ घनींचे फेसबुक अकाऊंट हॅक, तालिबान सरकारला मान्यता देण्याची पोस्ट व्हायरल

शेख मोहम्मद पुढे म्हणाले की, आपल्याला तालिबानशी चर्चा सुरु ठेवण्याची गरज असून त्यांनी वादग्रस्त कारवाईपासून दूर रहावे. आम्ही इस्लामिक देश म्हणून कायदा सुव्यवस्था कशी चालवतो आणि महिलांच्या समस्यांना कसे सामोरे जातो हे तालिबानला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. विशेष म्हणजे तुमच्यासमोर कतारचे उदाहरण आहे. आम्हीही एक मुस्लिम देश आहोत. आमच्याही देशात इस्लामी व्यवस्था आहे, परंतु जेव्हा कार्यशक्ती किंवा शिक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला कतारमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रिया आघाडीवर असल्याचे पाहायला मिळतील.

Sheikh Mohammed bin Abdul Rahman Al Thani
तालिबान सरकारला लवकरच मान्यता, प्रवक्त्याचा मोठा दावा

कतार हा अमेरिकेचा (America) सहयोगी देश असल्याचे मानले जाते. तालिबान व अमेरिका यांच्यातील चर्चेमध्ये हा देश महत्त्वाच्या वाटाघाटी करत आहे. याशिवाय तालिबानचे राजकीय कार्यालय देखील कतारमध्ये आहे. 15 ऑगस्ट रोजी काबूल ताब्यात घेतल्यापासून जगातील कोणत्याही देशाने तालिबानला अफगाणिस्तानमधील सरकार म्हणून मान्यता दिली नाही.

Related Stories

No stories found.