Queen Elizabeth II Death: राणी एलिझाबेथ II नंतर कोहिनूर मुकुट कोणाला मिळणार?

Queen Elizabeth II Death: ब्रिटनमध्ये सर्वाधिक काळ राज्य करणाऱ्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले.
Kohinoor
KohinoorDainik Gomantak

Queen Elizabeth II Death: ब्रिटनमध्ये सर्वाधिक काळ राज्य करणाऱ्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले. प्रकृती खालावल्याने त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. मात्र अखेर त्यांचा मृत्यू झाला. राजघराण्यातील सदस्यांच्या परवानगीने त्यांच्या मृत्यूची रात्री उशिरा अधिकृत घोषणा करण्यात आली. इथे, राणींचे पुत्र आणि नातू बालमोरल वाड्यात पोहोचले होते, जिथे त्यांची काळजी घेतली जात होती.

दरम्यान, त्यांच्या 70 वर्षांच्या कारकिर्दीनंतर, प्रिन्स चार्ल्स सिंहासनावर विराजमान होतील. त्यासोबत आणखी एक महत्त्वपूर्ण बदल होईल जो कोहिनूर हिऱ्याशी संबंधित आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, राणीने जाहीर केले होते की, 'प्रिन्स चार्ल्स सिंहासनावर आरुढ झाल्यानंतर त्यांची पत्नी कॅमिला डचेस ऑफ कॉर्नवॉल होतील. तसे झाल्यास कॅमिला यांना राज मातेचा प्रसिद्ध कोहिनूर मुकुट मिळेल.'

Kohinoor
Queen Elizabeth II Funeral : राणी एलिझाबेथ यांच्यावर 10 दिवसांनी होणार अंत्यसंस्कार

दुसरीकडे, कोहिनूर हा 105.6 कॅरेटचा हिरा आहे, जो शेकडो वर्षांपूर्वी भारतातून (India) इंग्लंडला नेण्यात आला होता. 14 व्या शतकात हा हिरा भारतात सापडला आणि कालांतराने वेगवेगळ्या राजांकडे गेला. 1849 मध्ये, पंजाबवरील (Punjab) आक्रमणानंतर ब्रिटिशांनी तो हिरा राणी व्हिक्टोरियाला दिला होता. तेव्हापासून तो ब्रिटिश क्राउन ज्वेल्सचा भाग आहे. पण तो भारतासह चार देशांमधील ऐतिहासिक मालकीच्या वादाचा विषय बनला आहे.

Kohinoor
बकिंगहॅम पॅलेसमध्ये स्वतः Queen Elizabeth II यांनी केलं होतं स्वागत; PM मोदींनी सांगितली आठवण

शिवाय, कोहिनूर हिरा सध्या किंग जॉर्ज VI च्या 1937 च्या राज्याभिषेकासाठी राणी एलिझाबेथसाठी बनवलेल्या प्लॅटिनम मुकुटात सेट आहे. तो टॉवर ऑफ लंडनमध्ये (Tower of London) प्रदर्शनात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com