Imran Khan तुरुंगात जाणार? न्यायालयाने दिला मोठा निर्णय

Pakistan News: पाक मीडियाने वृत्त दिले की, न्यायिक दंडाधिकार्‍यांनी अटक वॉरंट जारी केले आणि अधिकार्‍यांना माजी पंतप्रधानांना न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले.
Imran Khan
Imran KhanDainik Gomantak

Pakistan Former PM Imran Khan: क्वेटा येथील स्थानिक न्यायालयाने गुरुवारी पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे अध्यक्ष इम्रान खान यांच्याविरुद्ध पाकिस्तान दंड संहिते (पीपीसी) च्या अनेक कलमांखाली दाखल केलेल्या गुन्ह्यात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले.

पाक मीडियाने वृत्त दिले की, न्यायिक दंडाधिकार्‍यांनी अटक वॉरंट जारी केले आणि अधिकार्‍यांना माजी पंतप्रधानांना न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले.

रविवारी एका भाषणादरम्यान खान यांनी राज्य संस्था आणि त्यांच्या अधिकार्‍यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यांसाठी क्वेटा येथील पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला.

तक्रारदार अब्दुल खलील काकर यांनी पीटीआय प्रमुखांविरोधात बिजली रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

Imran Khan
Imran Khan यांच्या समर्थकांचा गदारोळ; लाहोरमध्ये निदर्शने-रॅलींवर बंदी; 7 दिवस कलम 144 लागू

इम्रान खान यांच्यावर हा आरोप आहे

पीटीआय प्रमुखांचे वक्तव्य सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप काकर यांनी केला होता.

नुकतेच इस्लामाबाद पोलिसांचे एक पथक तोशाखाना प्रकरणात इम्रान खान (Imran Khan) यांच्या जमान पार्क येथील निवासस्थानी पोहोचले होते. यानंतर, रविवारी पीटीआय प्रमुखांनी एका भाषणात 'राज्य संस्थांवर' जोरदार हल्ला चढवला.

गेल्या वर्षी, एप्रिलमध्ये सत्तेतून हकालपट्टी केलेले पंतप्रधान इम्रान खान यांनी लाहोरमधील (Lahore) त्यांच्या जमान पार्क येथील निवासस्थानी पक्ष कार्यकर्ते आणि समर्थकांना संबोधित करताना संताप व्यक्त केल्याचे पाक मीडियाने वृत्त दिले आहे.

यानंतर त्यांनी 'जेल भरो तहरीक' आंदोलनात भाग घेतला. आपल्या भाषणात खान म्हणाले की, 'मी कोणत्याही संस्था किंवा व्यक्तीपुढे झुकलो नाही आणि देशाला तसे करु देणार नाही.'

Imran Khan
Imran Khan: मी लष्कराची पंचिंग बॅग बनलो होतो; जनरल बाजवांचे कोर्ट मार्शल करा...

जिओ न्यूजनुसार, इम्रान खान म्हणाले की, सरकारने माझे नाव एक्झिट कंट्रोल लिस्ट (ECL) मध्ये टाकले आहे, कारण त्यांचा देश सोडण्याचा कोणताही विचार नाही.

Imran Khan
Imran Khan Attack Inside Story : इम्रान खान यांच्यावर हल्ला का झाला? हल्लेखोर म्हणाला...

तसेच, जनरल (निवृत्त) कमर जावेद बाजवा यांनी एका षड्यंत्राद्वारे देशावर गुन्हेगारांची गॅंग लादल्याचा आरोप करत इम्रान खान यांनी माजी लष्करप्रमुखांना फटकारले. आपल्याला खोट्या खटल्यांमध्ये न्यायालयात खेचले जात असल्याचेही पदच्युत पंतप्रधान इम्रान खान म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com