भारत चीन सीमावादावरुन राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 19 जानेवारी 2021

 भारतीय  सीमेपासून  साडेचार  किमी  आतमध्ये  येऊन  चीननं  बांधकाम  केल्याचं  समोर  आलं  आहे. राहुल  गांधीनी   चिंता  व्यक्त  करत  पंतप्रधान  मोदी  यांच्यावर   टिका केली," मै  देश  झुकने  नहीं  दूंगा"   

नवी दिल्ली :   गेल्या  काही  महिन्यांपासून  भारताच्या  हद्दीत  चीनने  शिरकाव  करत चक्क  गाव  उभारलं  आहे. हे  गाव  वसवल्याची  माहीती  सॅटलाइटच्या   माध्यमातून    सर्वांच्या  समोर  आली आहे. यावरुन  विरोधकांनी  मोदी सरकारवर  हल्लाबोल  केला.  

कॉंग्रेस  नेते  राहुल   गांधी  यांनी  चक्क  मोदींना  त्यांच्या  विधानाची  आठवण  करून  दिली.  चीननं  अरुणाचल  प्रदेशाच्या सीमा  भागात  गाव  वसवलं  आहे. चीनने   तब्बल  101 घरांची  वस्ती  वसवली.

 भारतीय  सीमेपासून  साडेचार  किमी  आतमध्ये  येऊन  चीननं  बांधकाम  केल्याचं  समोर  आलं  आहे. राहुल  गांधीनी   चिंता  व्यक्त  करत  पंतप्रधान  मोदी  यांच्यावर   टिका केली," मै  देश  झुकने  नहीं  दूंगा"  या  त्यांच्या  वचनाची  राहुल  यांनी  यावेळी   आठवण  करुन  देत  पंतप्रधान  नरेंद्र  मोदी  यांच्यावर  निशाणा  साधला. \Remember his promise- “मैं देश झुकने नहीं दूँगा।” pic.twitter.com/NdXT4hqkNK

संबंधित बातम्या