
Rahul Gandhi Statement: काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी सध्या युरोप दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांनी बेल्जियममध्ये पत्रकार परिषद घेतली आणि तेथून भारत, चीन आणि G20 शिखर परिषदेसह इतर विषयांवर भाष्य केले.
पण राहुल गांधींनी एका मुद्द्यावर मोदी सरकारशी सहमती दर्शवली. त्याचवेळी, चीनच्या मुद्द्यावर राहुल म्हणाले की, चीन एक विशेष दृष्टिकोन मांडत आहे. चीन बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हवर काम करत आहे, कारण तो जागतिक उत्पादनाचे केंद्र बनला आहे.
पण मला आमच्या बाजूने कोणताही पर्यायी दृष्टिकोन दिसत नाही. राजकीय आणि पर्यावरण स्वातंत्र्य असलेला पर्यायी दृष्टीकोन आपण कसा देऊ शकतो हे आपल्यासमोर आव्हान आहे. रशिया-युक्रेन (Ukraine) युद्धावरही राहुल यांनी भाष्य केले.
बेल्जियममधील पत्रकार परिषदेत राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, रशिया-युक्रेन संघर्षावर भारताच्या सध्याच्या भूमिकेशी संपूर्ण विरोधक सहमत असतील.
आमचे रशियाशी संबंध आहेत. सरकार सध्या जो प्रस्ताव मांडत आहे, त्यापेक्षा विरोधकांची काही वेगळी भूमिका असेल असे मला वाटत नाही.
त्याचवेळी, मल्लिकार्जुन खर्गे यांना जी-20 शिखर परिषदेच्या डिनरला आमंत्रित न करण्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल म्हणाले की, यावर काय म्हणता येईल, त्यांनी विरोधी पक्षनेत्याला न बोलावण्याचा निर्णय घेतला आहे, हे सर्व काही सांगून जाते. भारताच्या 60% लोकसंख्येचा नेता म्हणून ते महत्त्वाचे नाहीत हे यावरुन समजते.
इंडिया-भारत वादावर राहुल म्हणाले की, मला माहित नाही, तुम्हाला पंतप्रधानांना विचारावे लागेल. घटनेतील या शब्दप्रयोगवर मी पूर्णतः समाधानी आहे. सरकारमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुख्य मुद्यांपासून लक्ष विचलित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
आम्ही आमच्या युतीला 'इंडिया' हे नाव दिले आहे. मात्र, यामुळे पंतप्रधानांना त्रास झाला. पंतप्रधानांनी मुख्य मुद्यांपासून लक्ष भटकावण्यासाठी नवी रणनीती आणली आहे.
काश्मीरच्या मुद्द्यावर राहुल गांधी म्हणाले की, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. आमची भूमिका सीडब्ल्यूसीच्या प्रस्तावावर आहे. मला वाटते की, सध्या लोकशाही संरचनेचे संरक्षण करणे आवश्यक झाले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.