
Pakistan Political Crisis: पाकिस्तानातील परिस्थिती सुधारण्याचे नाव घेत नाही आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर आता इम्रानविरोधी राजकीय पक्ष एका व्यासपीठावर आले आहेत.
इम्रान यांच्या सुटकेविरोधात पीडीएमने सर्वोच्च न्यायालयासमोर निदर्शने सुरु केली आहेत. एवढेच नाही तर संतप्त जमावाने तिथे आपला तळ ठोकला आहे.
वास्तविक, पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (PDM) ही अनेक पक्षांची संघटना आहे. त्यात सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज, जमियत उलेमा-ए-इस्लाम-फजल (JUIF) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) यासह अनेक पक्षांचा समावेश आहे.
पाकिस्तानच्या (Pakistan) संसदेतही इम्रान यांना फाशी देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते राजा रियाझ अहमद खान म्हणाले की, 'इम्रान खान यांना जाहीर फाशी दिली पाहिजे, परंतु न्यायालये त्यांचे जावई असल्यासारखे स्वागत करत आहेत.'
दुसरीकडे, इम्रान यांच्या सुटकेवरुन पाकिस्तान सरकार आणि देशाचे सरन्यायाधीश यांच्यात तणाव वाढला आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या विरोधात निषेधाचा प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच, जाळपोळ आणि गोळीबारामुळे झालेल्या आंदोलकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? याची चौकशी झाली नसल्याचे इम्रान खान यांचे म्हणणे आहे.
सुमारे 7000 पीटीआय कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. दरम्यान, आमच्या सुरक्षा एजन्सी गुंडांना सर्वोच्च न्यायालयावर कब्जा करण्यासाठी आणि राज्यघटना नष्ट करण्यासाठी मदत करत आहेत.
संविधान आणि सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) नष्ट झाले तर पाकिस्तानच्या स्वप्नांचा अंत होईल, असेही इम्रान खान म्हणाले.
त्याचबरोबर, जाळपोळ आणि गोळीबारामुळे झालेल्या आंदोलकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? याची चौकशी झाली नसल्याचे इम्रान खान यांचे म्हणणे आहे. सुमारे 7000 पीटीआय कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यात आले.
दरम्यान, आमच्या सुरक्षा एजन्सी गुंडांना सर्वोच्च न्यायालयावर कब्जा करण्यासाठी आणि राज्यघटना नष्ट करण्यासाठी मदत करत आहेत. संविधान आणि सर्वोच्च न्यायालय नष्ट झाले तर पाकिस्तानच्या स्वप्नांचा अंत होईल, असेही इम्रान खान म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.