अमेरिकेत मिरवणूक, दीपप्रज्वलनाने आनंद साजरा

PTI
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

कॅनडातील ब्राम्पटन शहराचे महापौर पॅट्रिक ब्राऊन यांनीही हिंदू समाजाला शुभेच्छा दिल्या आहेत.

वॉशिंग्टन

अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी झाले. याच्या आनंदाप्रीत्यर्थ अमेरिकेतील भारतीयांनी दिवे प्रज्वलित केले व मंदिराच्या डिजिटल प्रतिमेची ट्रकमधून मिरवणूक काढली.
अमेरिकेत कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध असल्याने अनेक ठिकाणच्या हिंदू समाजातील नागरिकांनी यानिमित्त व्हर्च्युअल कार्यक्रमांचे आयोजन आज केले होते. वॉशिंग्टनमध्ये विश्‍व हिंदू परिषदेच्या सदस्यांनी श्रीरामाच्या जयघोषात मंदिराच्या डिजिटल प्रतिमेची मिरवणूक काढली. अन्य भागात हिंदू नागरिकांनी घरात पूजा करून दीपोत्सव साजरा केला. कॅलिफोर्नियातील हिंदू समुदायाचे नेते अजय जैन भुतोडिया यांनी सर्व भारतीयांचे विशेषतः हिंदू व जैन समाज आणि रामाचे पूजन करणाऱ्या सर्वांचे राम मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त अभिनंदन केले.
अयोया ऐतिहासिक घटनेचा आनंद व उत्साह अमेरिकेतील भारतीयांमध्ये दिसत होता. अनेकांसाठी ही दिवाळीच होती. ध्येतून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी संपूर्ण रात्र जागून काढल्याचे सिलिकॉन व्हॅलीतील कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या माणिक अडवानी यांनी सांगितले. श्रीरामाचे मंदिर उभारण्याचे हिंदूंचे स्वप्न साकार होत असल्याचे श्रेय अडवानी व भुतोडिया यांनी अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांना दिले. कॅनडातील ब्राम्पटन शहराचे महापौर पॅट्रिक ब्राऊन यांनीही हिंदू समाजाला शुभेच्छा दिल्या आहेत.
संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या