राफेल विमान घोटाळा : भारतीय दलालाला दिले होते 10 लाख युरो?

दैनिक गोमंतक
सोमवार, 5 एप्रिल 2021

फ्रान्समधील लढाऊ विमान राफेलच्या व्यवहाराबाबत फ्रेंच वेबसाइट मीडियापार्ट' या वेबसाईटने  एक धक्कादायक खुलासा केला आहे. मीडियापार्टने रविवारी 'राफेल पेपर्स' नावाचा अहवाल प्रसिद्ध केला असून त्यामध्ये राफेल कराराबाबत आणखी बरेच खुलासे झाले आहेत

फ्रान्समधील लढाऊ विमान राफेलच्या व्यवहाराबाबत फ्रेंच वेबसाइट मीडियापार्ट' या वेबसाईटने  एक धक्कादायक खुलासा केला आहे. मीडियापार्टने रविवारी 'राफेल पेपर्स' नावाचा अहवाल प्रसिद्ध केला असून त्यामध्ये राफेल कराराबाबत आणखी बरेच खुलासे झाले आहेत. फ्रान्स आणि भारत या दोन्ही देशांमध्ये 36 राफेल विमानांबाबात करार करण्यात करण्यात आल्यानंतर राफेल निर्माता कंपनी दसॉल्टने  भारतातील एका दलालाला 10 लाख युरो म्हणजेच 8 करोड 62 लाख रुपये दिल्याचा आरोप केला आहे. फ्रान्समधील भ्रष्टाचारविरोधी एजन्सीच्या हवाल्याने मीडियापार्ट'ने हे आरोप केले आहेत.

"वीजमंत्री निलेश काब्राल यांच्या हुकूमशाही वागणुकीचा निषेध"

मीडियापार्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, फ्रान्स आणि भारत या दोन्ही देशांमध्ये 36 लढाऊ राफेल विमानांच्या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर फ्रान्सने  भारतातील एका  दलालाला 8 करोड 62 लाख रुपये दिले होते. इतकेच नव्हे तर, भारतातील दुसऱ्या संरक्षण करारातही या दलालावर मनी-लॉन्डरिंगचे आरोप करण्यात आले आहे. दसॉल्टने राफेल विमानांच्या 50 बनावट प्रतिकृती बनविण्यासाठी हे पैसे देण्यात आल्याचा दावा 'मीडियापार्ट'ने केला आहे. मात्र असे कोणतेही मॉडेल्स तयार केले गेल्याचा कोणताही पुरावा निरीक्षकांना देण्यात आला नव्हता. अहवालानुसार, हे प्रकरण सर्वात आधी फ्रान्सची भ्रष्टाचारविरोधी एजन्सी फ्रान्सइज अँटीकॉर्पॉशन (एएफए) ने उजेडात आणले होते. एएफए'ने दसॉल्टचे ऑडिट  केल्यानंतर ही बाब उघडकीस आली होती. मात्र अद्याप या निधीसंदर्भात राफेल  कंपनीच्या वतीने फ्रेंच भ्रष्टाचारविरोधी अधिका-यांकडून कोणताही  प्रतिसाद मिळालेला नाही.

Share Market Update : कोरोनाच्या धास्तीमुळे भांडवली बाजार कोसळला; सेन्सेक्स आणि...

एजन्सीने आपल्या रिपोर्टमध्ये दसॉल्ट ग्रुपने व्यवहारामध्ये या रकमेचा उल्लेख  'भेटवस्तू रकम' म्हणून केला होता. तर डेफिस सोल्यूशन्स या भारतीय कंपनीच्या पावत्यावरून असू दिसून आले आहे की, त्यांनी 5 ओ मॉडेल्स तयार केले असून त्या  मॉडेलपैकी निम्मी रक्कम देण्यात आले आहे. यातील प्रत्येक मॉडेलची किंमत 20 हजार युरोपेक्षा जास्त होती. तथापि, या सर्व आरोपांवर डॅसॉल्ट ग्रुपचा कोणताही प्रतिसाद अद्याप आलेला नाही आणि ऑडिट एजन्सीला प्रतिसाद मिळाला नाही. तसेच, गिफ्टची रक्कम कोणाला आणि का दिली गेली हे दसॉल्टला  संगत आले नाही.  या अहवालात ज्या कंपनीचे नाव घेतले आहे, ती भारतीय कंपनी यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.  अहवालानुसार कंपनीच्या मालकाला अगस्ता वेस्टलँड घोटाळा प्रकरणात यापूर्वी तुरूंगात टाकण्यात आले होते. 

दरम्यान, 2016 मध्ये भारत सरकारने फ्रान्समधून 36 राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याचा करार केला होता. यातील एक डझन विमानही भारताला देण्यात आले असून 2022 पर्यंत सर्व विमानांचे वितरण होणार आहे. जेव्हा हा संरक्षण करार झाला तेव्हा भारतात अजूनही बरेच वादंग झाले. लोकसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसने राफेल  लढाऊ विमान खरेदीत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला घेरले होते.

संबंधित बातम्या