Sri Lanka आर्थिक अन् राजकीय संकटातून सावरला नाही? अमेरिकन अधिकाऱ्याने दिले उत्तर

Sri Lanka Crisis: श्रीलंकेच्या आर्थिक स्थितीला जबाबदार कोण? याचे उत्तर अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएचे प्रमुख बिल बर्न्स यांनी दिले आहे.
Sri Lanka
Sri LankaDainik Gomantak

Sri Lanka Crisis: श्रीलंकेच्या आर्थिक स्थितीला जबाबदार कोण? याचे उत्तर अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएचे प्रमुख बिल बर्न्स यांनी दिले आहे. श्रीलंकेच्या या आर्थिक स्थितीला चीन जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. खरे तर गेल्या काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंसह पेट्रोल- डिझेलचा मोठा तुटवडा आहे.

दरम्यान, गगनाला भिडणाऱ्या महागाईने (Inflation) देशातील सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. परदेशातून वस्तू आयात करण्यासाठी श्रीलंकेला परकीय चलनाची चणचण भासत आहे. श्रीलंकेच्या (Sri Lanka) आत्ताच्या समस्येमागील प्रमुख कारण म्हणजे चीनचे कर्ज आहे, ज्यातून श्रीलंका दलदलीतून बाहेर पडू शकला नाही.

Sri Lanka
Sri Lanka Crisis: श्रीलंकेतील परिस्थिती गंभीर, हल्ल्यात भारतीय अधिकारी जखमी

चीनी ऑफर नाकारणे सोपे नाही

श्रीलंकन सरकारने चीनकडून चढ्या व्याजदराने घेतलेले कर्ज हे देशाच्या आर्थिक पतनाचे प्रमुख कारण बनले. बर्न्स म्हणाले की, 'अशा देशांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी पैशाची आमिषे दाखवणे हा चीनचा (China) धंदाच बनला आहे. चीनकडे परकीय चलनाची कमी नाही, याशिवाय आपल्या चलन वापराच्या अटींमुळे त्यांच्या गुंतवणुकीच्या ऑफर इतक्या किफायतशीर बनवतात की, बहुतेक देशांचे राजकारणी त्या पटकन स्वीकारतात.'

दुसरीकडे, अस्पेन सिक्युरिटी फोरममध्ये आपल्या भाषणात बर्न्स म्हणाले की, जगातील प्रत्येक देशाने श्रीलंकेच्या आजच्या स्थितीकडे लक्ष दिले पाहिजे. चीन सरकारकडून कर्ज मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी खरोखरच मूर्खासारखी पैज लावली गेली. त्याची परिणीती श्रीलंकेच्या आत्ताच्या स्थितीत झाली, जिथे त्याचे परिणाम आर्थिक आणि राजकीय दोन्ही दृष्टया अत्यंत घातक आणि विनाशकारी बनले. बिल पुढे म्हणाले, 'मला वाटतं हा केवळ मध्य पूर्व आणि दक्षिण आशियातीलच (South Asia) नव्हे तर जगभरातील इतर अनेक देशांसाठी धडा असावा जेणेकरुन भविष्यात श्रीलंकेसारख्या चुका होणार नाहीत.'

Sri Lanka
Sri Lanka: पोटाची खळगी भरण्यासाठी श्रीलंकन महिलांना करावी लागतेय देहविक्री

जगभरातील तज्ञांची मते

'द वॉशिंग्टन पोस्ट' च्या रिपोर्टनुसार, चीन हा श्रीलंकेचा सर्वात मोठा कर्जदार आहे. केवळ अमेरिकन गुप्तचर संस्थेचे प्रमुखच नाही तर जगभरातील अनेक तज्ज्ञांचे असे मत आहे की, श्रीलंकेच्या या अभूतपूर्व आर्थिक संकटामागे चीनच्या कर्जाचा सापळा आहे. चीनने श्रीलंकेत मोठी गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये माजी राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांना मोठा फायदा झाला असल्याचे सांगितले जात आहे. 2000 ते 2020 पर्यंत चीनने श्रीलंकेला सुमारे 12 अब्ज डॉलर्स कर्ज दिले.

Sri Lanka
Sri Lanka Crisis: रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेचे हंगामी अध्यक्ष म्हणून घेतली शपथ

शिवाय, अहवालात असे स्पष्ट करण्यात आले आहे की, श्रीलंकेच्या सध्याच्या स्थितीचा पहिला खेला 2017 मध्ये सुरु झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com