श्रीलंकेच्या मंत्रिमंडळात राजपक्ष कुटुंबीयांची भरती

श्रीलंकेच्या मंत्रिमंडळात राजपक्ष कुटुंबीयांची भरती
श्रीलंकेच्या मंत्रिमंडळात राजपक्ष कुटुंबीयांची भरती

कोलंबो:  श्रीलंकेत सध्या दोन भावांचे सरकार आहे. अध्यक्षपदी गोटाबया राजपक्ष असून पंतप्रधानपदी त्यांचे मोठे बंधू महिंदा राजपक्ष आहेत. महिंदा यांनी आधी देशाचे अध्यक्षपदही सांभाळले आहे. हे कमी होते की काय, आता नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात राजपक्ष कुटुंबातील आणखी तीन सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. 

श्रीलंकेच्या नव्या मंत्रिमंडळाचा आज शपथविधी झाला. २८ कॅबिनेट आणि ४० राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. खातेवाटपात अध्यक्ष गोटाबया राजपक्ष यांनी स्वत:कडे संरक्षण मंत्रालय ठेवले असून अर्थ खाते महिंदा यांनी आपल्याकडे घेतले आहे. महिंदा यांचे थोरले पुत्र नमल राजपक्ष यांच्याकडे युवक कल्याण आणि क्रीडा खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. महिंदा यांचे मोठे बंधू चमल राजपक्ष यांची जलसंधारण मंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. चमल यांचे पुत्र शशींद्र यांनाही राज्य मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. राजपक्ष कुटुंबातील इतर अनेक सदस्यांकडे विविध प्राधिकरणे, मंडळे, सरकारी कंपन्या यांचे प्रमुखपद आहे. एक जण खासदार आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com