भारताचा उल्लेख करत बिल गेट्स म्हणाले..

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

जगातील विकसनशील देशांच्या हाती कोरोना लसींचा फॉर्म्युला देण्यात येऊ नये.

जगभरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. अनेक देशात कोरोनाची दुसरी आणि तिसरी लाट आली आहे. भारतामध्येही (India) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. याच पार्श्वभूमीवर भारतात 1 मे पासून कोरोनाच्या लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु होणार आहे. कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण हा उत्तम पर्याय मानला जात आहे. असं असतानाच मायक्रोसॉप्टचे (Maicrosoft) सहसंस्थापक आणि जगातील आघाडीच्या उदयोजकांपैकी एक असणाऱ्या बिल गेट्स(Bill Gate) यांनी कोरोना लसींसंदर्भात अतिशय महत्त्वाचं वक्तव्य केल्याने ते चर्चेत आले आहेत. जगातील विकसनशील देशांच्या हाती कोरोना लसींचा फॉर्म्युला देण्यात येऊ नये. कोरोनाची लस निर्माण करणं फार जबाबदारीचं काम आहे. विशेष, म्हणजे हे वक्तव्य करताना भारताचं उदाहरण दिलं आहे. यावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. (Referring to India, Bill Gates said)

माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत बिल गेट्स यांना कोरोना लसीकरणासंदर्भातील स्वामित्व अधिकाराविषयी विचारण्यात आला  होतं. लस बनवण्यासंदर्भातील माहितीवर असणारा स्वामित्व अधिकार रद्द करुन जगभरातील अनेक देशांबरोबर ती माहिती देण्यात यावी का? असं केल्याने जगभरातील अनेक देशांना कोरोना लसींचा पुरवठा वेगाने होईल का? असा प्रश्न बिल गेट्स यांना विचारण्यात आला होता. या विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना गेट्स यांनी, ‘नाही’  एवढचं उत्तर दिलं.

बायडन यांचा 100 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण; टेक ऑफसाठी ''अमेरिका'...

दरम्यान, ‘’पुढे आपली भूमिका स्पष्ट करताना बिल गेट्स यांनी भारताचा उल्लेख केला. जगामध्ये अनेक कोरोना लसीनिर्मीती करणाऱ्या संस्था आहेत. सगळेचजण कोरोना लसीच्या संदर्भात फारच गंभीर आहेत. असं असलं तरी जगातील इतर विकसनशील देशांना कोरोना लसीचा फॉर्म्युला सांगण्यात येऊ नये. अमेरिकेतील जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सनचे निर्मीती केंद्र आणि भारतामध्ये कोरोना लस निर्मिती करणाऱ्या केंद्रामध्ये फरक आहे. आपण कोरोनाची लस आपल्या पैशांनी आणि वैज्ञानिकांच्या मदतीने करतो,’’ असं बिल गेट्स म्हणाले आहेत. 

संबंधित बातम्या