पाच रिपब्लिकन सदस्यांचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील महाभियोगास पाठिंबा

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

अमेरिकेचे मावळते राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची प्रक्रिया करण्यासाठी पाच रिपब्लिकन सदस्यांनी डेमोक्रॅट सदस्यांसोबत जाण्याची तयारी दर्शविली आहे.

अमेरिकेचे मावळते राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची प्रक्रिया करण्यासाठी पाच रिपब्लिकन सदस्यांनी डेमोक्रॅट सदस्यांसोबत जाण्याची तयारी दर्शविली आहे. राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ 20 जानेवारी रोजी समाप्त होणार असून, नवनिर्वाचित जो बिडेन हे या दिवशी राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत. आणि त्याच्या सात दिवस अगोदरच ट्रम्प यांच्याच पक्षातील पाच सदस्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग आणण्यासाठी आपले समर्थन दिले असल्याची माहिती मिळाली आहे.   

भारतीय हवाई दलाच्या संरक्षण सिद्धतेत होणार मोठी वाढ 

अमेरिकेच्या कॅपिटॉलवर झालेल्या दंगलीनंतर आणि सात दिवसांनी होणाऱ्या नव्या शपथविधी समारंभासाठी राजधानी वॉशिंग्टन हाय अलर्टवर आहे. तसेच कॅपिटॉलच्या इमारतीची सुरक्षा देखील मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आलेली आहे. तर ट्रम्प यांना हटविण्यासाठी अमेरिकेच्या 25 व्या घटना दुरुस्तीची विनंती उपराष्ट्रपती माइक पेंस यांनी नाकारली आहे. मात्र सभागृहाच्या अध्यक्ष आणि डेमोक्रॅट नेत्या नॅन्सी पेलोसी यांनी महाभियोग प्रक्रियेसाठी नऊ व्यवस्थापकांची नेमणूक केलेली आहे. 

त्यानंतर आता रिपब्लिकन पक्षाच्या सदस्य लीझ चेनी यांच्यासह किमान पाच सदस्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील दुसर्‍या महाभियोगासाठी मतदान करणार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय लीझ चेनी यांनी जाहीर केलेल्या आपल्या निवेदनात, डोनाल्ड ट्रम्प यांनी राज्यघटनेच्या शपथ आणि अमेरिकेच्या राष्ट्रपती कार्यालयाचा मोठा विश्वासघात केल्याचे म्हटले आहे. रिपब्लिकन जैम हॅरेरा ब्यूटलर, जॉन काटको, अ‍ॅडम किन्झिंगर आणि फ्रेड अप्टन यांनी महाभियोगाला पाठिंबा दर्शविला.  

दरम्यान, मागील बुधवारी अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपिटॉल इमारतीच्या बाहेर जमून मोठा गोंधळ घातला होता. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली होती. अमेरिकेच्या कॅपिटॉल मध्ये घूसू पाहणारे ट्रम्प समर्थक आणि पोलिस यांच्या झालेल्या धुमश्चक्रीत चार आंदोलकांचा मृत्यू झाला होता.
  

संबंधित बातम्या