डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्याबाबत रिपब्लिकन पक्षातचं मतभेद

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 14 जानेवारी 2021

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्याबाबत रिपब्लिकन पक्षातचं मतभेद झाले आहेत.याच दरम्यान प्रतिनिधिगृहाने उपाध्यक्षांना 25 व्या  घटनादुरुस्तीनुसार ट्रम्प यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यास मंजूरी दिली आहे.

वाशिंग्टन: अमेरिकेची संसद असणाऱ्या कैपिटॉल हिल इमारतीत झालेला हिंसाचार लोकशाहीला काळिमा फासणारी घटना होती.या हिंसाचारास उत्तेजन देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्याबाबत रिपब्लिकन पक्षातचं मतभेद झाले आहेत.याच दरम्यान प्रतिनिधिगृहाने उपाध्यक्षांना 25 व्या  घटनादुरुस्तीनुसार ट्रम्प यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यास मंजूरी दिली आहे.

अमेरिकेचे उपाध्यक्ष माइक पेन्स यांनी प्रतिनिधिगृहाने ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्यापूर्वीच 25 व्या घटनादुरुस्तीनुसार ट्रम्प यांची अध्यक्ष पदावरुन हटवण्यासाठी सांगितले होते.यासंबंधीचा ठराव 223  विरुद्ध 205 अशा मतांनी मंजूर ही झाला होता.हे मतदान पक्षीय पातळीवर झालं होतं.

25 व्या  घटनादुरुस्तीनुसार उपाध्यक्षांना मंत्रीमंडळाची बैठक घेऊन अध्यक्षांना पदावरुन हटवण्यासाठी निर्णय घेण्याचा अधिकार देते. यानुसार विचार केल्यास उपाध्यक्ष माइक पेन्स हे मंत्रीमंडळाची बैठक घेऊन मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष पदावरुन दूर करण्याचा निर्णय घेवू शकतात.पेन्स यांनी प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्षा नन्सी पलोसी यांना लिहलेल्या पत्रात त्यांनी म्हटले की, 25 वी घटनादुरुस्ती ही राज्यघटनेत अध्यक्षांना पदावरुन हटवण्यासाठी केलेली नव्हती.

ट्रम्प यांची अध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केल्यास चुकीचा पायंडा पडण्याची शक्यता वर्तवली आहे. निर्वाचित अध्यक्ष म्हणून जो बायडन येत्या 20 जानेवारीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत.तत्पूर्वी मावळते राष्ट्राध्यक्ष असणारे डोनाल्ड ट्रम्प यांची अध्यक्ष पदावरुन हकालपट्टी होणार का? हा मोठा सवाल असणार आहे.  

संबंधित बातम्या