म्यानमारच्या सशस्त्र समुहाची भारताकडे आश्रय देण्याची विनंती; मिझोरममध्ये अलर्ट जारी

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

शेजारील देश  म्यानमारच्या चिन नॅशनल आर्मी (सीएनए) या सशस्त्र अतिरेकी संघटनेने म्यानमारमधील तख्तपालटाच्या पार्श्वभूमीवर आपल्या कुटुंबियांसाठी भारतात आश्रय मागितला आहे.

गुवाहाटी : शेजारील देश  म्यानमारच्या चिन नॅशनल आर्मी (सीएनए) या सशस्त्र अतिरेकी संघटनेने म्यानमारमधील तख्तपालटाच्या पार्श्वभूमीवर आपल्या कुटुंबियांसाठी भारतात आश्रय मागितला आहे. मिझोरमच्या चंपाई जिल्हा उपायुक्त मारिया सीटी ज्युली यांनी सांगितले की, चिन नॅशनल फ्रंट (सीएनएफ) च्या सशस्त्र युनिट (सीएनएने) 40 कुटुंबांना भारतात आश्रय देण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले, 'सीएनएने यासंदर्भात फरकावन ग्रामपरिषदेच्या अध्यक्षांशी चर्चा केली आणि त्यांनी याबाबत चंपाई जिल्हा प्रशासनाला कळविले आहे. 

चीन झुकलं! पॅंगॉन्ग त्सो भागातून सैन्य मागे घेण्यास सुरवात 

गमाली म्हणाले की, त्यांनी यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सैन्याच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर म्यानमारहून मोठ्या संख्येने शरणार्थी येण्याची शक्यता असल्याबाबत जिल्हा प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. मिझोरमपासून 404 किमी अंतरावर म्यानमारची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. गमाली यांनी मंगळवारी जारी केलेल्या अधिसूचनेत सर्व गावांना या भागातल्या म्यानमारच्या शरणार्थींच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाला माहिती देण्यास सांगण्यात आले आहे.

भारताची अफगाणिस्तानला काबुल नदीवरील 'शहतूत' धरणाची भेट

अधिकाऱ्यंनी सांगितले की 1980 च्या दशकात लष्करी राजवटीमुळे म्यानमारच्या चिन समुदायाचे हजारो लोक मिझोरममध्ये आले होते. म्यानमारध्ये लोकशाही परत आल्यावर झाल्यानंतर बरेच लोक परत गेले. परंतु, हजारो लोक अजूनही इथेच स्थायिक आहेत.

संबंधित बातम्या