कोरोना संदर्भात WHO कडून चीनची पाठराखण?
who.jpg

कोरोना संदर्भात WHO कडून चीनची पाठराखण?

कोरोना विषाणूच्या उत्पत्ती नंतर सुमारे वर्षभरापेक्षा जास्त काळ उलटून गेल्यावर जागतिक आरोग्य संघटना आणि चीन संयुक्त विद्यमानाने  कोरोनाच्या संक्रमणाचे  कारण शोधण्याचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहिती नुसार, जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या संशोधनातुन कोरोना विषाणू वटवाघळापासून इतर प्राण्यांच्या माध्यमातून माणसांपर्यंत आला असल्याच्या मोठ्या शक्यता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून दिसून येते.(Research by the World Health Organization has revealed the cause of the corona virus infection)    

कोरोना विषाणूची उत्पत्ती झाल्यानंतर जगभरातुन चीनवर (China+) कोरोना विषाणू निर्माण केल्याचा आरोप होत होता. प्रयोगादरम्यान चीनच्या प्रयोगशाळेतूनच या विषाणूची गळती झाली असल्याचे नंतर समोर आलेल्या काही अहवालातून दिसून आले. त्याच अनुशंघाने जागतिक आरोग्य संघटना कोरोना विषाणूच्या  (Corona Virus) उत्पत्ती आणि संक्रमणाच्या कारणाचा शोध घेईल असे अपेक्षित होते, मात्र या संघाने ही बाब वगळता इतर सर्व गोष्टींवर संशोधन केल्याचे दिसून येते. दरम्यान वारंवार या अहवालास उशीर झाल्याचे पाहायला मिळाले आहे, त्यामुळे चीन या अहवालात आपली बाजू सुरक्षित ठेवण्यासाठी काही फेरफार करत आहे का? असाही प्रश्न उपस्थित होतो आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेशी (WHO) संबंधित जिनिव्हा येथील एका अधिकाऱ्याने माध्यमांना  ओळख न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. त्यामुळे हा अहवाल जगासमोर येण्याआधी या अहवालात अजून काही फेरफार होऊ शकतो का ? असाही प्रश्न उपस्थित होतो आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटना चीनसोबत संगनमताने काम करते असा आरोप करत, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागितिकी आरोग्य संघटनेशी असलेले संबंध तोडून टाकले होते.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com