Thumb Test ने ओळखा तुमच्या हृदयाची स्थिती

Thumb Test
Thumb Test

वॉशिंग्टनः एका साध्या थम टेस्टद्वारे(Thumb Test) आपल्याला हृदयाचा(Heart) गंभीर आजार आहे की नाही ते आपण जाणून धेवू शकतो. येल युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमधील(Yale University School of Medicine)  डॉक्टरांचे म्हणणे आहे की, ही चाचणी खूप प्रभावी आहे आणि वेळेवर अचूक माहिती देण्यात मदत करते. या चाचणीद्वारे आपण एओर्टिक एन्युरिझम(Aortic Aneurysm) सारख्या आजाराविषयी माहिती मिळवू शकता. या मुळे आपल्यात असलेली आजाराची भीती कमी होवून त्यावर आपण योग्य वेळी उपचार करू शकतो.(Researchers suggest Identify your heart condition with a thumb test)

लवकर निदान करणे फार महत्वाचे आहे
'द सन' च्या अहवालात डॉक्टरांच्या सल्यानुसार, महाधमनी आपल्या शरीरातील सर्वात मोठी रक्तवाहिनी आहे. या रक्तवाहिनीद्वारे आपल्या हृदयापासून(Deadly Heart Problem) उर्वरित शरीरावर रक्तप्रवाह होत राहतो. काही विशिष्ट कारणामुळे या धमनीच्या आतमध्ये बलून सारखी सूज येते, ज्यामुळे महाधमनी कमकुवत होऊ लागतात, जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतात मात्र, याचे लवकरच निदान लागल्यास त्यावर लवकरच उपचार करता येतो.

महाधमनी एन्युरिझमची कोणतीही लक्षणे नाहीत
एर्टिक एनोरेयझममध्ये सामान्यत: लक्षणे नसतात आणि केवळ स्क्रीनिंगद्वारे या आजाराचे निदान लागू शकते. एखाद्या व्यक्तीला हे लक्षात येईपर्यंत खूप उशीर झाला असतो. सूज फुगलेल्या बलूनइतकी मोठी होते. या अवस्थेत अंतर्गत रक्तस्त्राव आणि शक्यतो मृत्यू होऊ शकतो. हा बलून फुटल्याच्या घटनांमध्ये 10 पैकी 8 जणांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू होतो. 

या टेस्ट करा
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार थम टेस्ट करणे खूप सोपे आहे. यासाठी प्रथम हात वर करा आणि तळहात बाजूला पसरवा. यानंतर अंगठ्याला तळहात्याच्या दुसर्‍या बाजूला हलवण्याचा प्रयत्न करा. जर अंगठा हाताच्या बाहेर निघत असेल तर आपण त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा. डॉक्टरांचे म्हणणे आहे की अशा प्रकारे अंगठा हलविण्यात एक्सपर्ट होणे म्हणजे संबंधित व्यक्तीचे सांधे सैल असल्याचे हे अप्रत्यक्ष चिन्ह आहेत. याव्यतिरिक्त, हे महाधमनीसह संपूर्ण शरीरात (Connective Tissue Disease) लक्षण असू शकते..

305 लोकांवर चाचणी केली
संशोधकांनी 305 लोकांवर थम चाचणी घेतली आणि अमेरिकन जर्नल ऑफ कार्डिओलॉजीमध्ये त्यांचे निष्कर्ष प्रकाशित केले. या संशोधनाचे ज्येष्ठ लेखक डॉ. जॉन ए एलेफेरिएड्स(Dr John A Elefteriades) म्हणाले की, संशोधनादरम्यान असे आढळले की जे लोक सपाट हस्तरेखाच्या पलीकडे थंब हलविण्यास सक्षम होते त्यांना महाधमनी रक्तविकाराचा धोका होता. मात्र, त्यांनी असेही स्पष्ट केले की, याचा अर्थ असा नाही की अशा अवस्थेत महाधमनी मध्ये सूज येवून तो बलून फूटनारच. या टप्प्यावर पोहोचण्यासाठी सहसा कित्येक वर्षे लागतात. "यावर जोर देणे आवश्यक आहे की प्रत्येकजण जो सकारात्मक चाचणी करतो तो एन्युरिजम रूग्ण नसतो ... तसेच, संशोधकांनी नमूद केले की एन्युरिज्म अनेकदा फूटण्याच्या स्टेजपर्यत पोहचण्यासाठी अनेक वर्ष घेतो त्यामुळे एन्युरिज्म ची सकारात्मक चाचणी घाबरण्याला कारणीभूत ठरत नाही," या प्रकाशनात म्हटले आहे.

स्मोकींग करणे टाळले पाहिजे

रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रे (CDC) म्हणतात की 2018 मध्ये 9923 मृत्यूंपैकी महाधमनी  एन्युरिझम होते आणि पुरुषांमध्ये संबंधित मृत्यूंपैकी 50% पेक्षा जास्त होते. एका फेडरल टास्क फोर्स च्या सल्ल्यानुसार 65-75 वयोगटातील पुरुषांनी धूम्रपान करू नये, असे म्हटले आहे. महाधमनी रोगाच्या धोक्याचा सर्वात मोठा घटक असताना, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल आणि हार्ड रक्तवाहिन्यांसारख्या परिस्थिती देखील एन्युरिझमचा धोका वाढण्याची  शक्याता आहे, त्यामुळे स्मोकींग करणे टाळले पाहिजे असे, सीडीसीचे म्हणणे आहे. या आजाराच्या उपचारांमध्ये औषधे आणि शस्त्रक्रियेचा समावेश असतात, ज्यात रक्तदाब कमी होतो आणि महाधमनी एन्यूरिज्मचा धोका कमी होतो आणि नंतरच्या काळात धमनी गेलेल्या एओर्टा एन्यूरिज्म ला दुरूस्त करण्याचं काम या  शस्त्रक्रियेच्या उपतारातून केलं जातं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com