पाकिस्तनाचे पितळ उघड,तालिबानच्या मदतीला पाठवले 'दहशतवादी'

अफगाणिस्तानमध्ये तालिबानसाठी लढणाऱ्या काही दहशतवाद्यांची ओळख पाकिस्तानी दहशतवादी (Pakistan Terrorism) संघटना लष्कर-ए-तैयबाचे (Lashkar-e-Taiba) सदस्य म्हणून झाली आहे.(Pakistan)
Revealed: Pakistan sends terrorists to Taliban
Revealed: Pakistan sends terrorists to TalibanDainik Gomantak

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळवल्यानंतर पाकिस्तानची (Pakistan) नापाक भूमिका आता हळूहळू स्पष्ट होत आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानसाठी लढणाऱ्या काही दहशतवाद्यांची ओळख पाकिस्तानी दहशतवादी (Pakistan Terrorism) संघटना लष्कर-ए-तैयबाचे (Lashkar-e-Taiba) सदस्य म्हणून झाली आहे. त्यापैकी बहुतेक पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील आहेत. पाकिस्तानी सैन्याने त्यांना लष्करच्या दहशतवादी छावण्यांमध्ये प्रशिक्षण दिल्यानंतर तालिबानच्या मदतीसाठी पाठवले आहे. (Revealed: Pakistan sends terrorists to Taliban)

पाकिस्तानचा पंजाब प्रांत दहशतवाद्यांचा गड

पाकिस्तानचा पंजाब प्रांत हा लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मुहम्मद या दोन दहशतवादी संघटनांचा गड आहे ज्याला त्याच्या सैन्याने पाठिंबा दिला आहे. असे मानले जाते की लष्करमधील पंजाब प्रांतातील दहशतवाद्यांची संख्या 10 हजारांहून अधिक आहे.

तालिबानला मदत करण्यासाठी पाकिस्तानने दहशतवादी पाठवले

पाकिस्तानी लष्कराचे अनेक दहशतवादी अफगाणिस्तानच्या कंधारमध्ये तालिबानशी लढताना दिसले आहेत. यातील अनेकांचे बळीही गेले आहेत. पाकिस्तानातून पाठवलेल्या दहशतवाद्यांचे नेतृत्व शैफुल्ला खालिद करत होतो , जो 11 अन्य दहशतवाद्यांसह कंधारच्या नवाही जिल्ह्यात झालेल्या चकमकीत ठार झाला आहे . असे म्हटले जाते की खालिदची जागा पंजाब प्रांतातील इम्रान नावाच्या दहशतवाद्याने घेतली आहे. इम्रान यापूर्वी जम्मू -काश्मीरमध्ये सक्रिय होता आणि अनेक दहशतवादी कारवायांमध्ये देखील तो सहभागी होता.

Revealed: Pakistan sends terrorists to Taliban
भारताने अफगाणिस्तानमधील राजनैतिक उपस्थिती कायम ठेवावी; तालिबान केली विनंती

दहशतवाद्यांच्या उपचारासाठी सुरू केले रुग्णालय

अहवालांनुसार, पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह त्यांच्या घरी पाठवण्याचीही व्यवस्था करतो. अफगाणिस्तानमध्ये लढणाऱ्या लष्कर आणि इतर दहशतवाद्यांच्या उपचारासाठी पाकिस्तान तात्पुरते रुग्णालयही चालवत आहे.

पाकिस्तानी लष्कर तरुणांना बनवत आहे दहशतवादी

पाकिस्तानचे लष्कर जबरदस्तीने तरुणांना दहशतवादी बनवत आहे. क्वेटा, डेरा इस्माईल खान, कराक, हंगू, कोहाट, पेशावर, मर्दन आणि नवशेरा येथील तरुणांना प्रशिक्षण देऊन अफगाणिस्तानात जाण्यास भाग पाडले जात आहे. पाकिस्तानचे हे कृत्य आता जगासमोर आले आहे कारण या प्रांतांमधील काही तरुण कराचीत आले आहेत.

तालिबानचा जुना मित्र आहे पाकिस्तान

तालिबानला पाकिस्तानचा पाठिंबा नवीन नाही. पण पाकिस्तानने नेहमीच ते नाकारले आहे. आता लष्करचे दहशतवादी अफगाणिस्तानात सापडल्यानंतर त्याची भूमिका स्पष्ट झाली आहे.जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी पाठवण्यापूर्वी पाकिस्तानी लष्कर त्यांना तालिबानच्या ताब्यात असलेल्या भागात प्रशिक्षण देत आहे. जैशचा म्होरक्या मसूद अजहरचेही तालिबानी दहशतवाद्यांशी घनिष्ठ संबंध आहेत. तालिबानशी लढण्यासाठी त्याने आपले दहशतवादी अफगाणिस्तानातही पाठवले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com