ब्रिटीश राजघराण्यातील गुपीतं मेगन मर्केल यांनी केली उघड

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 8 मार्च 2021

राजघराण्यात असताना आपल्य़ा मनात सतत आत्महत्या करण्य़ाचा विचार येत होता.

ब्रिटीश राजघराण्यातील युवराज प्रिन्स हॅरी यांच्या सोबत ओपरा निन्फ्रेला येथे दिलेल्या मुलाखतीत मेगन मार्केल यांनी मोठा खुलासा केला आहे. राजघराण्यात असताना आपल्य़ा मनात सतत आत्महत्या करण्य़ाचा विचार येत होता. राजघराण्याला आपल्या बाळाचा रंग काय असेल याची चिंता लागून राहिली होती. असं मर्केल यांनी सांगितले. राजघराण्यात आपल्या बाळाच्या रंगाबाबत चर्चा झाली होती अली माहिती मेगन मर्केल यांनी या मुलाखती दरम्यान माहिती दिली.

त्यापुढे म्हणाल्य़ा, ''आर्चीच्या जन्माआधी युवराज प्रिन्स यांच्यासोबत याबाबतील चर्चा झाली होती. यावेळी त्यांना बाळाच्या रंगाची चिंता लागली होती. बाळ ज्यावेळी जन्म घेईल त्यावेळी त्याचा रंग गोरा नसेल तर त्याला युवराज करण्यासाठी तसेच कोणत्याही सुरक्षा पुरवण्यास राजघराण इच्छुक नव्हतं. हॅरीच्या कुटुंबीयांनी त्याच्याशी केलेल्या चर्चेची माहिती मला देण्यात आली होती. मात्र यावेळी चर्चा करणाऱ्य़ा कुटुंबीयातील सदस्यांची नावे उघड करण्यास नकार दिला आहे. नावे उघड केल्य़ास त्यांच्यासाठी खूपच नुकसारकारक ठरणार असल्याचं म्हटलं आहे.''

स्वित्झर्लंडमध्ये महिलांना बुरखा घालण्यास बंदी; या निर्णयाचं देशात स्वागत आणि...

''राजघऱाण्यात राहत होतो त्यावेळी आपल्या मनात सतत आत्महत्या करण्य़ाचा विचार येत होता. हे त्यावेळी युवराज प्रिन्स हॅरी यांना सांगण्यास मला लाज वाटत होती... मला जगण्याची इच्छा नव्हती. माझ्या मनात हा भयानक विचार सतत येत होता. त्यावेळी मी मदतीसाठी एका संस्थेत गेली होती. मली यासंबंधी मदत मिळण्यासाठी कुठे तरी गेलं पाहिजे असं मी त्यावेळी सांगितलं होतं. याआधी मला असं कुठेच आणि कधीच वाटलं नव्हतं,'' अशी माहिती मेगन यांनी दिली. मेगन आणि युवराज प्रिन्स यांनी गतकाळात राजघराण्याचा त्याग केला होता.

''ज्यावेळी मी राजघराण्याशी जोडले गेले त्यावेळी आपलं स्वातंत्र कमी झालं होतं. राजघराण्यामुळे मला खूप एकटेपणा आला होता. अनेक दिवसांपासून आपल्याला एकटेपणा जाणवत होता. या आधी मला एकटेपणा कधीच जाणवला नव्हता. मला अनेक नियमांच्या बंधनात बांधून ठेवलं होतं. मित्र आणि मैत्रीणींसोबत बाहेर लंच जाण्यासाठीचीही मुभा नव्हती,'' असही मेगन यांनी सांगितले    

 

संबंधित बातम्या