स्वीडनमध्ये दंगल, कुराण प्रकरणावरुन सौदी अरेबिया आक्रमक

स्वीडनमध्ये रमजान महिन्यात मुस्लिमांचा पवित्र ग्रंथ कुराण जाळल्याप्रकरणी दंगल उसळली असून त्यात अनेक पोलीस जखमी झाले असून तीन जणांना गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.
Crown Prince Mohammed bin Salman of Saudi Arabia
Crown Prince Mohammed bin Salman of Saudi ArabiaDainik Gomantak

स्वीडनमध्ये (Sweden) रमजान महिन्यात मुस्लिमांचा पवित्र ग्रंथ कुराण जाळल्याप्रकरणी दंगल उसळली असून त्यात अनेक पोलीस जखमी झाले असून तीन जणांना गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. स्वीडनमधील गटांनी मुद्दाम कुराण जाळल्याच्या प्रकरणी सौदी अरेबिया (Saudi Arabia) या मुस्लिम देशामध्ये खळबळ उडाली आहे. सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने कुराण जाळल्याचा तीव्र निषेध केला असून, हे जाणूनबुजून प्रक्षोभक कृत्य असल्याचे म्हटले गेले आहे. (Riots in Sweden Quran case in Saudi Arabia Aggressive)

Crown Prince Mohammed bin Salman of Saudi Arabia
गरोदर पत्नीला खांद्यावर घेऊन नवरा चालतो जळत्या कोळशावर

सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, सौदी अरेबिया पवित्र कुराण आणि मुस्लिमांचा जाणीवपूर्वक अपमान केला तसेच चिथावणी देण्याच्या घटनेचा देखील निषेध करतो. निवेदनात सौदी परराष्ट्र मंत्रालयाने संवाद, सहिष्णुता आणि सहअस्तित्वाची मूल्ये वाढवण्यासाठी एकत्रित प्रयत्नांच्या महत्त्वावर भर दिला आहे. द्वेष, अतिरेकी आणि सर्व धर्मांच्या पवित्र स्थळांवर होणारे हल्ले रोखण्यावर भर देण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, स्वीडनमध्ये अतिउजव्या गटांनी कुराण जाळल्यानंतर दंगली उसळल्या आहेत. डेन्मार्कच्या राजकीय पक्ष हार्ड लाइनचा अतिरेकी नेता रासमुस पालुदान याने गुरुवारी अनेक स्वीडिश शहरांमध्ये कुराण जाळण्याचे कार्यक्रम आयोजित केले.

कार्यक्रमात कुराणाच्या प्रती जाळण्यात आल्या. आपण कुराण जाळले असून हे काम आपण यापुढेही सुरू ठेवणार असल्याचे पालुदान यांनी सांगितले आहे. कुराण दहनाच्या घटनेनंतर गुरुवार ते रविवारपर्यंत हिंसाचार झाला, ज्यात सुमारे 16 पोलीस जखमी झालेत. अनेक वाहने जाळण्यात अडकली आहेत. नॉरशॉपिंग शहरात रविवारी हिंसाचार झाला, ज्यामध्ये तीन जणांना पोलिसांच्या गोळ्या लागल्याचे समोर आले आहे.

पंतप्रधान मॅग्डालेना अँडरसन (PM Magdalena Andersson) यांनी हिंसाचाराचा निषेध केला. तर पोलिसांनी ऑनलाइन निवेदनात म्हटले आहे की, 'तीन जणांना गोळ्या लागल्याचे दिसत आहे आणि आता त्यांच्यावर रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत. तीनही जखमींना गुन्ह्याच्या संशयावरून अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, रविवारी संध्याकाळी नॉरशॉपिंगमधील परिस्थिती शांत झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com