पाकिस्तानला लस पुरवठा करण्याच्या प्रश्नावर मोदी सरकारने केली भूमिका स्पष्ट

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 23 जानेवारी 2021

मोदी सरकारने कोरोना लसीच्या संदर्भात जोरदार डिप्लोमसी सुरु केली आहे. भारताने शेजारी असणाऱ्या नेपाळ, मॉरीशेस, भूतान, म्यानमार, बांग्लादेश या  देशांना कोरोना लसींचा साठा पाठवला आला आहे.

नवी दिल्ली: देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात मोठी लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. मात्र दुसरीकडे मोदीसरकारने कोरोना लसीच्या संदर्भात जोरदार डिप्लोमसी सुरु केली आहे. भारताने शेजारी असणाऱ्या नेपाळ, मॉरीशेस, भूतान, म्यानमार, बांग्लादेश या  देशांना कोरोना लसींचा साठा पाठवला आला आहे.

मात्र शेजारीच असणाऱ्या पाकिस्तानला अद्याप कोरोनाची लस देण्यात आली नाही. आता पाकिस्तानला लसीचा पुरवठा करणार का असा प्रश्न विचारला जात आहे. सध्याच्या स्थीतीत सगळ्याच देशांना कोरोनाच्या आवश्यकता भासत आहे. भारत हा सदैव शेजारी असणाऱ्या देशांना मदत करत आला आहे. मात्र पाकिस्तान आणि चीन या देशांबरोबर संबंध सामान्य स्थितीचे बिलकुल नाहीत.

पाकिस्तान हा भारताच्या विरोधात सतत दहशतवादाला प्रोत्साहन देत आला. भारतावर दहशतवादी हल्ले घडवून आणण्याच्या पाकिस्तानच्या प्रवृत्तीमुळे दोन्ही देशातील संबंध कटुतापूर्ण राहिले आहेत. पाकिस्तानने शह दिलेला दहशतवादासारखा राक्षस त्यांच्याच मानगुटीवर बसला आहे. आता इतर शेजारी देशांना कोरोनाच्या लसीचा पुरवठा केला जात तसा पाकिस्तानला केला जाणार का असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. मात्र त्यासंबधीची पाकिस्तानकडून कोणतीही विनंती करण्यात आलेली नाही, असे भारतसरकारकडून शुक्रवारी स्पष्टपणे सांगण्यात आले.

भारताने सध्या म्यानमार, बांग्लादेश, नेपाळ, भूतान, मालदीव या देशांना कोवीशील्ड लसीचा पुरवठा करणयात आला आहे. काही मंजुऱ्या मिळाल्यानंतर अफगाणिस्तान आणि श्रीलंका या देशांना सुध्दा कोवीशील्ड लसीचा पुरवठा लकरात लवकर करण्यात येणार आहे.'' भारतीय बनावटीच्या लसीचा पुरवठा करण्यासाठीची कोणतीही विनंती पाकिस्तानने केल्याचे मला माहित नाही'' असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले.

 

संबंधित बातम्या