Russia Ukraine War: रशियाकडून पोलंडवर क्षेपणास्त्र हल्ला? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी बोलावली तातडीची बैठक

रशिया आणि युक्रेनमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.
Russia Ukraine War
Russia Ukraine WarDainik Gomantak

एकीकडे जागतिक पातळीवर जी-20 परिषदेत भारत, अमेरिका, फ्रान्स यांच्यासारखे देश परस्पर सहकार्य, शास्वत विकास, यासारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करत आहेत. तर दुसरीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाने पुन्हा उग्र रुप धारण केले आहे. रशिया-युक्रेन यांच्यातील संघर्ष आता नाटो देशांपर्यंत पोहोचला आहे. आज रशियाने डागलेले क्षेपणास्त्र पोलंड देशात पडले आहे. या घटनेत 2 नागरिकांचा मृत्यू झाला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Jo Biden) यांनी नाटो सदस्य देशांच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. यामुळे परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेनमधील युद्ध आता जगासाठी धोकादायक बनत आहे. रशियाने डागलेले क्षेपणास्त्र नाटोचा सदस्य असलेल्या पोलंड देशावर पडले आहे. यामध्ये पोलंडमधील दोन नागरिकांचा जीव गेला आहे. रशियाच्या या कृतीचा युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी निषेध केला आहे.

रशियाच्या (Russia) या कृतीची पोलंड सरकारने देखील दखल घेतली आहे. पोलंडचे पंतप्रधान मॅथ्यूझ मोरविकी यांनी ‘प्राथमिक अंदाजानुसार डागण्यात आलेले क्षेपणास्त्र हे रशिय बनावटीचे आहे. पण आम्ही या घटनेची सखोल चौकशी करत आहोत.

हे क्षेपणास्त्र नेमके कोणी डागले, हे अद्याप निश्चितपणे समजलेले नाही. आमची यंत्रणा त्याचा शोध घेत आहे. आम्ही आमची लष्करी तयारी करत आहोत,’ असे सांगितले आहे. तर पोलंडच्या परराष्ट्र खात्याने देखील डागण्यात आलेले क्षेपणास्त्र हे रशियान बनावटीचे असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

दरम्यान, रशियाच्या या हल्ल्याचा अमेरिकेने (America) निषेध केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्य जो बायडेन यांनी एकीकडे जी-20 शिखर परिषद सुरू असतानाच दुसरीकडे इंडोनेशियामध्ये जी-7 आणि नाटो सदस्य देशांच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. तसेच नाटोचे सरचिटणीस जेम्स स्टोल्टेनबर्ग यांनीदेखील नाटो सदस्य देशांच्या राजदुतांची आपत्कालीन बैठक बोलावली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com