रशिया युद्धाच्या तयारीत!

अमेरिकेच्या (America) अण्वस्त्रवाहू युद्धनौका, पाणबुड्या या समुद्री भागात सद्या गस्त घालत आहेत.
रशिया युद्धाच्या तयारीत!
Russian President Vladimir PutinDainik Gomantak

रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) युद्ध होण्याची दाट शक्यता आहे. युरोपवर युद्धाचे संकट आले असताना अमेरिकेच्या (America) अजस्त्र युद्धनौका या भागातील समुद्रात पोहोचल्या आहेत. यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेभागात मोठ्या प्रमाणावर टँक, तोफा, युद्धामध्ये वापरली जाणारी वाहने त्याचबरोबर सैनिकही येथे तैनात केलेले आहेत. यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन हे युद्धाची तयारी करत आहेत असे चित्र दिसून येत आहे. त्याचसोबत अमेरिकेने देखील काही दिवसांपूर्वी रशिया युक्रेनवर हल्ला कटेल असा या युरोपियन देशांना इशारा दिला होता.

तसेच, वोरोनेझ (Voronezh) शहराजवळ हजारो रशियन सैनिक एकत्र आले आहेत. वोरोनेझ हे शहर युक्रेनच्या पासून जवळपास 320 किमी आहे. हेरगिरी करणारी संघटनेकडून सांगण्यात आले आहे की, या शहरात मोठ्या प्रमाणावर टँक, तोफा आणि आर्मड व्हेईकल तैनात केले आहेत. ही शस्त्रास्त्रे मॉस्कोवरून आणली आहेत. आणि यामध्ये टी-80 यू हा सर्वात खतरनाक रणगाड्याचा समावेश आहे.

 Russian President Vladimir Putin
जर रशिया किंवा चीनशी युद्ध झाले तर... अमेरिकन जनरलने दिला इशारा

तसेच, हे टँक आणि अन्य शस्त्रास्त्रे रेल्वेने या भागात घेऊन जात आहेत. काळ्या समुद्रात (black sea) नाटोच्या देशांनी युद्धाभ्यासाचा सर्व केला होता. यावर पुतीन यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच काही गुप्तहेरीनी आरोप केले होते. यामुळे रशियाने आंतरराष्ट्रीय संघटनेमधून माघार घेतली. यानंतर नाटोने युद्धाभ्यास सुरु केला. यादरम्यान नाटोने स्ट्रॅटेजिक एअरफोर्सचा वापर केला होता यामुळे पुतीन भडकले होते.

युरोपमध्ये बेलारूस आणि पोलंड या भागात देखील तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नाटोने युद्धाभ्यास पूर्वनियोजित केला नव्हता असा आरोप पुतीन यांनी केला. पुतीन यांच्या या वक्तव्यानंतर अमेरिकेकडून युद्धनौकांची सहावी बटालियन (Battalion) काळ्या समुद्रात पाठवण्यात आली. अमेरिकेच्या अण्वस्त्रवाहू युद्धनौका, पाणबुड्या या समुद्री भागात सद्या गस्त घालत आहेत. यूएसएस माऊंट व्हिटन सुद्धा समुद्रात दाखल झाली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com