रशियाने सर्वात मोठ्या हायड्रोजन बॉम्बस्फोटाचे चित्रफीत जारी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

रशियाने ५९ वर्षांपूर्वी केलेल्या चाचणीची माहिती उघड

मॉस्को: रशियाने ५९ वर्षांपूर्वी केलेल्या जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन बाँबच्या स्फोटाच्या चाचणीची व्हिडिओ चित्रफीत रशियाच्या ‘रोसस्तोम’ या अणुऊर्जा संस्थेने नुकतीच प्रसारित केली आहे. याला ‘झार बाँबा’ किंवा ‘झार बाँब’ असे म्हटले जाते.

या बाँबची चाचणी प्रथम ३० ऑक्टोबर १९६१मध्ये घेण्यात आली. जपानमधील हिरोशिमा शहरावर १९४५ मध्ये टाकलेल्या अणुबाँबपेक्षा रशियाच्या हा हायड्रोजन बाँब तीन हजार ३३३ पटीने अधिक विध्वंसक असल्याचे सांगितले जाते.

‘टीएनटी’च्या स्फोटाशी तुलना
‘न्यूयॉर्क टाईम्स’मधील वृत्तानुसार आर्टिक सागरातील नोव्हाया झेमलिया या द्विपसमूहात या बाँबची पहिली चाचणी झाली. या स्फोटाचे चित्रीकरण आतापर्यंत गुप्त ठेवण्यात आले होते. ‘टॉप सिक्रेट ः टेस्ट ऑफ ए क्लिन हायड्रोजन बाँब विथदिन ए यिल्ड ऑफ मेगाटोन्स’ या शीर्षकाच्या या चित्रीकरणात बाँब कसा तयार केला जातो आणि चाचणीस्तरावर त्याचास्फोट करण्यापूर्वी तो चाचणीच्यास्थळी कसा आणला जातो, हे यात दाखविले आहे.

प्रखर प्रकाश व धुरांचे ढग
‘रोस्तोम स्टेट एनर्जी कॉर्पोरेशन’ने यासंबंधीची चित्रफीत २० ऑगस्टला पहिल्यांदाच प्रसारित केली. हा बाँब ‘सोव्हिएट टीयू-९५’ या बाँबवाहकातून चाचणीच्या स्थळी आणण्यात आला होता. पॅराशूटला जोडलेला झार बाँब हा विमानातून सोडल्यानंतर उलट गणना सुरू झाली होती. समुद्रसपाटीपासून चार हजार मीटर उंचीवरील नियोजित स्थळी तो पोचल्यावर त्याचा प्रखर प्रकाशासह स्फोट झाला. 

बाँब तयार करण्यामागे...

  •   अण्वस्त्र क्षेत्रातील अमेरिका व रशियातील स्पर्धेतून बाँबची निर्मिती.
  •     अमेरिकेने पहिला अणुबाँब तयार करून १९४५ मध्ये त्याची चाचणी घेतली.
  •     मात्र तत्कालीन सोव्हिएट महासंघाने जगातील सर्वांत विनाशक बाँब तयार केला.
  •     अमेरिकेने हिरोशिमावर टाकलेल्या ‘लिटिल बॉय’आणि ‘फॅट मॅन’ या अणुबाँबप्रमाणे स्वरूप
  •     हा बाँब एवढा शक्तिशाली आहे की युद्धात वापरण्यासाठी तो अत्यंत घातक असल्याचे सांगितले जात असे.

संबंधित बातम्या