Russian School मध्ये गोळीबार, 5 मुलांसह 9 जण ठार; हल्लेखोराने स्वतःवर झाडली गोळी

Russia School Shooting News: मध्य रशियातील इझेव्हस्क शहरातील एका शाळेत झालेल्या गोळीबारात पाच मुलांसह नऊ जण ठार झाले आहेत.
Crime News
Crime NewsDainik Gomantak

Gun Attack At Russian School: मध्य रशियामधील इझेव्हस्क शहरातील एका शाळेत झालेल्या गोळीबारात पाच मुलांसह नऊ जण ठार झाले आहेत. "या गोळीबारात दोन सुरक्षा रक्षक, दोन शिक्षक, तसेच पाच अल्पवयीन मुलांसह नऊ लोकांचा मृत्यू झाला," असे रशियन तपास समितीने टेलिग्रामवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तर एएफपीच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोराने देखील स्वतःवर गोळी झाडली आहे.

दरम्यान, सोमवारी सकाळी एका हल्लेखोराने शाळेवर हल्ला केला होता. उदमुर्तिया प्रदेशाचे गव्हर्नर अलेक्झांडर ब्रोचालोव्ह (Governor Alexander Brochalov) यांनी एक व्हिडिओ जारी करुन सांगितले की, अज्ञात हल्लेखोराने या प्रदेशाची राजधानी इझेव्हस्क येथील एका शाळेत घुसून सुरक्षा रक्षक आणि तिथे उपस्थित असलेल्या काही मुलांची हत्या केली. “पीडितांमध्ये लहान मुले आहेत. तर काही लोक जखमीही झाले आहेत."

Crime News
Russia: 'रशियाकडून भारत आमचं रक्त विकत घेतोय', युक्रेनियन परराष्ट्रमंत्र्यांची टीका

दुसरीकडे, ज्या शाळेत हा हल्ला झाला, त्या शाळेत (School) पहिली ते अकरावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवले जाते. गव्हर्नर आणि स्थानिक पोलिसांच्या (Police) म्हणण्यानुसार, हल्लेखोराने स्वतःवर गोळी झाडली.

Crime News
युक्रेनियन बिझनेस टायकूनच्या घरावर Russia ने डागले क्षेपणास्त्र, पत्नीसह झाला मृत्यू

हल्लेखोराबाबत सध्या कोणतीही माहिती नाही

शाळा रिकामी करण्यात आली असून परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. हल्लेखोर कोण होता आणि त्याचा हेतू काय होता याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. इझेव्हस्कमध्ये 640,000 लोक राहतात. हे मॉस्कोच्या पूर्वेस सुमारे 960 किमी अंतरावर आहे, मध्य रशियाच्या उरल पर्वत प्रदेशाच्या पश्चिमेस आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com