रशियाने चोरला ऑक्सफोर्ड -एस्ट्राझेनेकाचा फॉर्म्युला; अहवालातून धक्कादायक खुलासा

अहवालानुसार, यूकेच्या ऑक्सफर्ड / एस्ट्राझेनेका (Oxford/AstraZeneca) लसीची ब्लू प्रिंट रशियन हेरांनी चोरली होती.
रशियाने चोरला ऑक्सफोर्ड -एस्ट्राझेनेकाचा फॉर्म्युला; अहवालातून धक्कादायक खुलासा
Sputnik VDainik Gomantak

जगभरात कोरोनाचा संसर्ग (Covid 19) पुन्हा एकदा वाढू लागला असताना दुसरीकडे मात्र कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशांनी कोरोना प्रतिबंधक लसींची निर्मीतीही केली आहे. याच पाश्वभूमीवर कोरोना विषाणूविरुद्ध लस तयार करणारा रशिया (Russia) जगातील पहिला देश होता. रशियाने प्रथम स्पुटनिक व्ही (Sputnik V) नावाची लस तयार केली. परंतु आता ही लस बनवणाऱ्या रशियन कंपनी गेमालया नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीवर कोरोना लसीचा फॉर्म्युला चोरला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका अहवालानुसार, यूकेच्या ऑक्सफर्ड / एस्ट्राझेनेका (Oxford/AstraZeneca) लसीची ब्लू प्रिंट रशियन हेरांनी चोरली होती. त्यानंतर त्याचा वापर स्पुतनिक व्ही (Sputnik V) लस तयार करण्यासाठी केला गेला.

द सनच्या अहवालानुसार, यूकेच्या मंत्र्यांना सांगण्यात आले आहे की, रशियाने ऑक्सफर्ड/एस्ट्राझेनेका कोविड -19 लस फॉर्म्युला चोरला असून त्याचा वापर स्वतःची स्पुटनिक लस बनवण्यासाठी केला.

Sputnik V
पोर्तुगालमध्ये जेष्ठ नागरिकांना मिळणार कोरोनाचा बुस्टर डोस

सूत्रांनी कथितपणे मंत्र्यांना सांगितले की, रशियासाठी काम करणाऱ्या हेरांनी स्वतःची स्पुटनिक लस बनवण्यासाठी एस्ट्राझेनेका कंपनीकडून कोविशील्ड लसीचा फॉर्म्युला चोरल्याचे ठोस पुरावे आहेत. हा दावा अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Russian President Vladimir Putin) यांनी दावा केला की, आम्हाला काही महिन्यांपूर्वीचं कोरोना विरुध्द लस मिळाली आहे. रशियाची स्पुटनिक लस ऑक्सफर्ड-डिझाइन केलेल्या लसीसारखीच तंत्रज्ञान वापरते, असे अहवालात म्हटले आहे. यूकेच्या सुरक्षा संघांला याची खात्री आहे की, त्यांचा फॉर्म्युला चोरीला गेला आहे. या संबंधीचा डेटा परदेशी एजंटने वैयक्तिकरित्या चोरला होता.

Sputnik V
आता 'हे' औषध ठरणार कोरोनावर रामबाण उपाय

दरम्यान, व्लादिमीर पुतीन म्हणतात की, 'मी स्पुटनिक व्ही लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत'. तसेच त्यांनी रशियन नागरिकांनाही या लसीचे दोन्ही डोस घेण्याचे आवाहन केले आहे. तथापि, ही लस अद्याप आंतरराष्ट्रीय स्तरावर मंजूर झालेली नाही. असे असूनही, 70 देशांनी या लसीचा वापर करण्यास मंजूरी दिली आहे.

शिवाय, द सनने आपल्या अहवालात म्हटले आहे की, सप्टेंबरमध्ये मॉस्कोमध्ये दोन प्राथमिक क्लिनिकल चाचण्यांचे परिणाम प्रतिष्ठित यूके जर्नल द लॅन्सेटमध्ये प्रकाशित झाले आहेत. यामधून हे सूचित होते की, रशियाची लस सुरक्षित आणि प्रभावी आहे. रशियन बनावटीची स्पुटनिक लस बनविण्याचे तंत्रज्ञान ऑक्सफोर्डच्या लसीप्रमाणेच आहे. रशियन अभ्यासात फक्त 76 लोक सामील होते आणि त्यापैकी फक्त अर्ध्या लोकांना प्रत्यक्षात लस दिली आहे.

Related Stories

No stories found.