पंतप्रधान मोदींच्या दहशतवादविरोधी भूमिकेस रशियाचा पाठिंबा

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

दहशतवाद आणि कोरोना महामारीसारख्या प्रश्नांना सामोरे जाताना जराही गाफील राहण्याची चूक परवडणार नसल्याचे पुतीन यांनी सांगितले.

नवी दिल्ली- दहशतवादास प्रोत्साहन देणाऱ्या देशांना त्यासाठी जबाबदारी धरण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भारताचे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्‍स बैठकीत केले. मोदींच्या या सूचनेस रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी पाठिंबा दिला.

पाकिस्तानचे नाव न घेत त्यांना लक्ष्य करताना मोदी यांनी दहशतवाद हा जगासमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे. दहशतवाद्यांना प्रोत्साहित करणाऱ्या देशांना यासाठी जबाबदार धरायला हवे, असे सांगितले. त्यांनी ब्रिक्‍सचे दहशतवाद विरोधी धोरण हे मोठे यश असल्याचे सांगितले. दहशतवाद आणि कोरोना महामारीसारख्या प्रश्नांना सामोरे जाताना जराही गाफील राहण्याची चूक परवडणार नसल्याचे पुतीन यांनी सांगितले.

बाराव्या ब्रिक्‍स बैठकीच्या निमित्ताने नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष झी जीनपींग पुन्हा एका मंचावर आले. दोन्ही नेते समोरासमोर येण्याची ही आठ दिवसांतील दुसरी वेळ आहे.

 

 

संबंधित बातम्या