रशियाला दक्षिण युक्रेनवर कब्जा करू देणार नाही - वोलोदिमिर झेलेन्स्की

वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत केले स्पष्ट
Russia Vs Ukraine War
Russia Vs Ukraine WarDainik Gomantak

गेले शंभरहून अधिक दिवस सुरु असलेल्या रशिया - युक्रेन युद्धाने दोन्ही राष्ट्रांचे अमर्याद नुकसान केले आहे. असे असले तरी या युद्धाबरोबर संपुर्ण जग ही या युद्धाची झळ सोसत आहे. इंधन तुटवड्याने जगाच्या अर्थव्यवहारावर परिणाम झाला आहे. अनेक राष्ट्रे अर्थिक गर्तेत खोल - खोल जाताना दिसत आहेत. अशी स्थिती असताना रशिया - युक्रेन युद्ध मात्र थांबण्याऐवजी ते वाढत आहे. (Russia Ukraine war situation updates vladimir putin zelensky ukraine responded to russian attack )

Russia Vs Ukraine War
France Exit Poll: अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी संसदेत गमावले बहुमत

या पार्श्वभूमीवर युक्रेनच्या सैन्याने रविवारी पूर्वेकडील सेवेरोडोनेत्स्क शहरानजिकच्या गावांवर रशियन हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले. युक्रेनच्या लष्कराने शाकिव्का भागात रशियाचा हल्ला हाणून पाडला. यामुळे रशियन सैन्याला माघार घ्यावी लागली तर दुसरीकडे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत सांगितले की, युक्रेनचे सैन्य देशाच्या दक्षिणेकडील भाग रशियाच्या ताब्यात जाऊ देणार नाही.

Russia Vs Ukraine War
Sri Lanka Crisis: माजी क्रिकेटपटूचा मदतीचा हात पुढे, देशवासीयांना दिला 'हा' सल्ला

झेलेन्स्की यांनी युद्ध सुरू झाल्यापासून त्यांनी प्रथमच देशाच्या दक्षिणेकडील मायकोलायव्ह शहराला भेट दिली. येथे त्यांनी स्थानिक अधिकार्‍यांची बैठक घेतली आणि त्यांच्या शौर्याबद्दल सैनिकांचा गौरव केला.

नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी रविवारी सांगितले की, रशिया-युक्रेन युद्धाला अनेक वर्षे लागू शकतात. युक्रेनियन सैन्याला आधुनिक शस्त्रास्त्रांचा पुरवठा केल्याने डोनबास प्रदेश रशियन ताब्यापासून मुक्त होण्याची शक्यता वाढेल, असेही त्यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात स्टोलटेनबर्गच्या विधानानुसार जुन्या सोव्हिएत काळातील शस्त्रांऐवजी NATO मानक शस्त्रे युक्रेनला मिळण्याची शक्यता आहे.

एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार युक्रेनच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, रशिया युक्रेनचे दुसरे मोठे शहर खार्किव हे आघाडीचे शहर बनवण्याचा प्रयत्न करत आहे. एजन्सीने युक्रेनच्या गृहमंत्र्यांचे सल्लागार वदिम डेनिसेन्को यांचा हवाला दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com