Russia Ukraine War: जगातील सर्वात मोठे विमान पुन्हा घेणार उड्डाण, पुनर्बांधणीसाठी अब्जावधीचा खर्च

Russia Ukraine Crisis: आता या विमानाची पुनर्बांधणी करण्याची योजना आखली जात आहे.
Plane
PlaneDainik Gomantak

Russia Ukraine Crisis: रशियन सैन्याने या वर्षी फेब्रुवारीमध्ये जेव्हा युक्रेनवर आक्रमण केले तेव्हा सुरुवातीच्या काळातच जगातील सर्वात मोठे विमान उद्ध्वस्त केले. आता या विमानाची पुनर्बांधणी करण्याची योजना आखली जात आहे. सरकारी मालकीच्या अँटोनोव्ह कंपनीने सोमवारी फेसबुकवर पोस्ट केलेल्या निवेदनानुसार, आम्ही दुसऱ्या अँटोनोव्ह An-225 कार्गो विमानाच्या डिझाइनचे काम सुरु केले आहे. हे विमान युक्रेनियनमध्ये मिरिया- "स्वप्न" म्हणून देखील ओळखले जाते. मात्र, रशियाची युक्रेनमधील मोहीम संपले तेव्हाच तपशील दिला जाईल, असेही अँटोनोव्ह यांनी स्पष्ट केले आहे.

दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च होणार आहेत

कीव (Kyiv) जवळील एअरफील्डच्या दुरुस्तीदरम्यान फेब्रुवारीमध्ये नष्ट झालेल्या भव्य विमानाच्या पुनर्बांधणीमध्ये अनेक अडथळे आहेत. अँटोनोव्हचा असा अंदाज आहे की, 88-मीटर (290-फूट) पंखांच्या विस्ताराची पुनर्बांधणी करण्यासाठी किमान 40,88,87,50,000 रुपये ($500 दशलक्ष) खर्च येईल. पण पैसा कुठून आणणार हा मोठा प्रश्न आहे. कारण रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनची (Ukraine) अर्थव्यवस्था अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे.

Plane
Russia Ukraine War: 'सेक्सी ड्रेस' घाला, युक्रेनियन महिलांना का केलं जातयं आवाहन

5 वर्षांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो

अँटोनोव्हची मूळ कंपनी, सरकारी-संचालित युक्रोबोरोनप्रॉमने विमानाच्या नाशानंतर सुरुवातीला सांगितले की, आम्हाला विमानाच्या पुनर्बांधणीसाठी पाच वर्षांपेक्षा जास्त वेळ लागेल. त्याचवेळी, पुनर्बांधणीचा खर्च $3 अब्जपेक्षा जास्त खर्च येईल.

Plane
Russia-Ukraine War: रशियाने उद्धवस्त केली युक्रेनची 30 टक्के वीज पुरवठा केंद्रे

तसेच, सहा इंजिन असलेल्या जेटने डिसेंबर 1988 मध्ये पहिल्यांदा उड्डाण केले. महामारीच्या काळात जगभरात कोविड-19 लसींची वाहतूक करण्यासाठी याचा वापर करण्यात आला. परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा सारख्या राजकीय व्यक्तींनी त्याचा रॅलींग पॉइंट म्हणून वापर केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com