Russia-Ukraine : रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी जेलेंस्कीने दिला नवीन फॉर्मुला

Russia-Ukraine: युक्रेनचे राष्ट्रपती वालदीमिर जेलेस्की यांनी युक्रेनमध्ये शांतता आणण्यासाठी तीन टप्यातली योजना सांगितली आहे.
President of Ukraine President Zelensky
President of Ukraine President ZelenskyDainik Gomantak

Russia-Ukraine : गेल्या अनेक महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. याबरोबरच ,या दोन देशांमध्ये सातत्याने आरोप -प्रत्यारोपही होत असतात. २४ फेब्रुवारीला रशिया ने युक्रेनवर हल्ला केला होता ,तेव्हापासून हे युद्ध सुरुच आहे. रशियाने याला विशेष सैन्य अभियान असे नाव दिले आहे.

रशियाने हे युद्ध थांबवावे यासाठी अनेक प्रयत्न केले गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्रपती वालदीमिर जेलेस्की यांनी युक्रेनमध्ये शांतता आणण्यासाठी तीन टप्यातली योजना सांगितली आहे. G-7 च्या ऑनलाईन शिखर परिषदेत त्यांनी याबाबत सांगितले आहे. नई ताकद हा पहिला टप्पा असेल असे त्यांनी म्हटले आहे. यानुसार युक्रेनला टँक , दूर पल्ल्याची मिसाईल, रॉकेट आर्टिलरी युक्रेनमध्ये उपलब्ध करणार असल्याचे म्हटले आहे. युक्रेनच्या संरक्षण ताफ्यात वाढ होईल. रशियाला थांबवण्यास मदत होईल, युक्रेनच्या प्रदेशात रशियाला येण्यास परवानगी देणार नाही.

President of Ukraine President Zelensky
Tawang Clash: तवांगमधील चकमकीवर चीनची पहिली रिअ‍ॅक्शन, सीमा वादावर म्हणाले...

दुसरा टप्पा आहे, लवचिकपणा .याअंतर्गत युक्रेन ( Ukraine ) मध्ये शांतता, सामाजिक , ऊर्जा आणि आर्थिक स्थिरता आणणे . नवीन कूटनीती या तिसऱ्या टप्प्यात युक्रेनच्या आपले क्षेत्र आणि नागरिकांच्या मुक्तीसाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर, रशिया -युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी मागच्या महिन्यात प्रस्तावित केलेली दहा सूत्रीय योजनेवर चर्चा करण्यासाठी एक वैश्विक शांति सूत्र शिखर संमेलनाचे आयोजन करण्याचे जेलेंस्कीनी सुचवले आहे. पाश्चिमात्य देशांनी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली रशियाला युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. रशियावर विविध निर्बंधही घातले गेले आहेत. या युद्धाचा संपुर्ण जगावर परिणाम होत असल्याने रशिया -युक्रेन युद्ध कधी संपणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com